विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्ट्रिक शपथविधीचा मुहूर्त ठरला असून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 9 जून 2024 रोजी सायंकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी होणार आहे. शपथविधी समारंभाच्या तयारीच्या निमित्ताने 8 जून, 15 जून आणि 22 जून या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनातला चेंज ऑफ गार्डचा कार्यक्रम होणार नाही. राष्ट्रपती भवनातून अधिकृतरित्या ही माहिती जारी करण्यात आली. Prime Minister and other members of the Union Council of Ministers at 7.15 pm on June 09, 2024, at Rashtrapati Bhavan.
नरेंद्र मोदींचा शपथविधी राष्ट्रपती भवन, नवीन संसद भवन, कर्तव्य पथ किंवा भारत मंडपम् येथे होणार असल्याच्या अटकळी प्रसार माध्यमांनी बांधल्या होत्या. या सगळ्या अटकळी प्रत्यक्ष शपथविधी ठरल्यानंतर दूर झाल्या.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 9 जून 2024 रोजी सायंकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनातच होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना राष्ट्रपतींनी निमंत्रण पाठवले आहे. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध रामगुलाम, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू, नेपाळचे पंतप्रधान प्रचंडा आदी नेत्यांचा समावेश आहे.
Prime Minister and other members of the Union Council of Ministers at 7.15 pm on June 09, 2024, at Rashtrapati Bhavan.
महत्वाच्या बातम्या
- NDA 8 जून करू शकते सरकार स्थापनेचा दावा; राष्ट्रपती भवनात 9 जूनला शपथविधीची शक्यता
- दिल्ली विमानतळावर स्टालिन + चंद्राबाबू यांच्यात नुसत्याच गाठीभेटी; की NDA – INDI आघाडीत एकमेकांची सेंधमारी??
- मुस्लिम प्रभाव क्षेत्रात एकगठ्ठा मतदानाचा भाजपला देशभरात 30 % फटका!!; ममता + राहुल + अखिलेश + उद्धव या “लाभार्थीं”च्या जागा वाढल्या!!
- NDAच्या बैठकीपूर्वी नितीश सरकारने केली ‘ही’ मोठी मागणी