विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात काँग्रेस नेहमीच सक्रिय असते .मोदींवर विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडताना पाहायला मिळत असताना काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.Pride, Prejudice and Punditry: Narendra Modi after Sardar Patel
नरेंद्र मोदी हे चतुर राजकीय नेते आहेत. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख आणि चमक त्यांनी दाखवली, असे गौरवोद्गार थरुर यांनी काढले आहेत.
शशी थरुर यांनी आपल्या Pride, Prejudice and Punditry: The Essential Shashi Tharoor या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. सरदार वल्लभभाई पटले राष्ट्रीय नेते आणि गुजरातींचे प्रतिनिधित्व करणारी बडी असामी होती. नरेंद्र मोदीही तसेच आहेत. नरेंद्र मोदी एक चतुर राजकीय नेते आहेत. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा स्वतःचे वेगळेपण त्यांनी जगाला दाखवून दिले, असे थरुर यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या भूमिकेपासून वेगळा विचार
सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आक्रमकपणे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारसाबाबत दावा केला होता. आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार करत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य ६०० फूट उंच प्रतिमेसाठी देशभरातून लोखंड दान करण्याचे आवाहन केले होते.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच पुतळा तयार करण्यात आला, असे थरुर यांनी म्हटले आहे. तसेच सन २००२ मध्ये गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन झाली होती. मात्र, तरीही कठोर आणि निर्णायक कारवाई करणारा नेता म्हणून सरदार पटेल यांच्यापेक्षा आपले वेगळेपण त्यांनी दाखवून दिले, असे थरुर यांनी म्हटले आहे.
स्वघोषित हिंदू राष्ट्रवादी
शशी थरुर यांनी आपल्या पुस्तकात पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी स्वघोषित हिंदू राष्ट्रवादी असून, ते स्वतःला गांधीवादी नेते असल्याचे दावाही करतात, ज्यांनी कधीही आपल्या भारतीय राष्ट्रवादाला धार्मिक लेबल लावले नाही, असा उपरोधिक टोलाही थरुर यांनी लगावला.
तसेच सरदार पटेल यांनी धर्म आणि जातीयवादापासून दूर जाऊन सर्वांसाठी समान अधिकारावर विश्वास ठेवला होता, असे थरुर यांनी पुस्तकात म्हटले आहे.
Pride, Prejudice and Punditry: Narendra Modi after Sardar Patel
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल