वृत्तसंस्था
रायपूर – स्वा. सावरकरांची तुलना बॅ. महमंद अली जीनांशी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आता नवे खळबळजनक विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. Prices of all commodities is soaring high be it pulses or oil. The petrol price is increasing just like Tendulkar’s centuries
भूपेश बघेल यांनी देशातल्या वाढत्या महागाईची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वयाशी आणि सचिन तेंडुलकरच्या शतकांशी केली आहे. ते म्हणाले, की देशात सर्वच वस्तूंची महागाई प्रचंड वाढत आहे. जशी सचिन तेंडुलकरच्या शतकांची संखा जशी वाढली, तशी महागाई वाढते आहे.
आधी असे सांगितले जात होते, की महागाई पंतप्रधानांच्या वयाएवढी होऊन थांबेल. पण महागाईने आता त्यांच्या वयाचा आकडा देखील ओलांडला आहे. तेलाच्या किमती असोत की डाळींच्या किमती. त्या वाढतच चालल्या आहेत, अशी टीका भूपेश बघेल यांनी केली.
पूर्वी, भूपेश बघेल यांनी स्वा. सावरकर आणि बॅ. महंमद अली जीना यांची तुलना करून असाच वाद ओढवून घेतला होता. जीनांच्या आधी सावरकरांनी धर्माच्या आधारावर व्दिराष्ट्रवादाचा सिध्दांत मांडला होता. त्यामुळे देशाची भारत – पाकिस्तान अशी फाळणी झाली. जीनांनी सावरकरांचा व्दिराष्ट्रवादाचा सिध्दांत उचलून धरला होता, असा दावा बघेल यांनी केला होता.