वृत्तसंस्था
अयोध्या : तब्बल 550 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये उभ्या राहिलेल्या राम जन्मभूमी मंदिरात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बालक रामाचे आज दर्शन घेतले. राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर राष्ट्रपतींचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. राष्ट्रपतींनी गर्भगृहात जाऊन बालक रामांचे दर्शन घेतले आणि सायं आरती केली.President’s grand reception in Ayodhya; Go to Ram Janmabhoomi temple and see baby Rama!!
तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हनुमान गढी येथे जाऊन श्री हनुमानाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच अयोध्येत शरयूतीरी श्री माता शरयू नदीची आरती केली आणि त्यानंतर राष्ट्रपती बालक रामाच्या दर्शनासाठी राम जन्मभूमी मंदिरात पोहोचल्या. राम जन्मभूमी ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींचे यथोचित स्वागत केले.
बालक रामांच्या गर्भगृहात राष्ट्रपतींच्या हस्ते पूजा आणि सायं आरती करण्यात आली.
President’s grand reception in Ayodhya; Go to Ram Janmabhoomi temple and see baby Rama!!
महत्वाच्या बातम्या
- IMF कडून पाकला 9 हजार कोटी रुपयांची मदत; भारताने तिसऱ्या हफ्त्याच्या बाजूने मतदान केले नाही
- ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!
- मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- “… पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील” ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!