विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सर्वदृष्टीय संबंधात मोठे पाऊल टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत – अमेरिका व्यापार दुपटीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 500 बिलियन डॉलर्स वर पोहोचवण्याचा निर्धार केला. सध्या हा व्यापार 129 बिलियन डॉलर्स एवढा आहे. President Trump often talks about MAGA.
दोन्ही नेत्यांनी भेटीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या घोषणा केल्या. त्यामध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या घोषणेचा चतुराईने उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोटो सगळ्या अमेरिकेला आणि जगाला माहिती आहे. ते म्हणतात, मी अमेरिका ग्रेट अगेन MAGA, आम्ही देखील भारतात असेच मोठे ध्येय ठेवले आहे. 2047 पर्यंत “विकसित भारत” हे आमचे ध्येय आहे.
अमेरिकेच्या भाषेत बोलायचे झाले, तर मेक इंडिया ग्रेट अगेन MIGA असा त्याचा अर्थ होतो. एकीकडे अनेक अमेरिका ग्रेट अगेन MAGA तर दुसरीकडे मेक इंडिया ग्रेट अगेन MIGA हे दोन्ही जेव्हा एकत्र येते तेव्हा ते मेगा MEGA बनते. MEGA म्हणजे भारत – अमेरिका संबंधांच्या समृद्धीसाठी आणि जागतिक विकासासाठी एक समृद्ध पार्टनरशिप, असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील दाद दिली.
ऑइल, गॅस, रिनिएबल एनर्जी, ऑटोमिक एनर्जी या सगळ्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करतील. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होईल. 2030 पर्यंत या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे काम झाले असेल, असा निर्वाळा दोन्ही नेत्यांनी दिला.
President Trump often talks about MAGA.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे + काँग्रेसच्या टोकाच्या विरोधापोटी महाराष्ट्राच्या राजकारणात पिकवली जातेय विश्वासघाताची पोळी!!
- Nitish Kumars : भाजपसोबतच्या संबंधांबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले…
- Mamata Banerjee : बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना ११ कोटींची नोटीस पाठवली, आणखी ३ नेते रडारवर