• Download App
    बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते 17 डिसेंबरला उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!! |President Ramnath Kovind to inaugurate Ramna Kali Temple in Dhaka on 17 th DEC

    बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते 17 डिसेंबरला उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!

    वृत्तसंस्था

    ढाका : स्वतंत्र बांगलादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या समारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 17 डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते बांगलादेशची राजधानी ढाका येथील रमणा काली मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे रमणा काली मंदिर ऐतिहासिक आहे.President Ramnath Kovind to inaugurate Ramna Kali Temple in Dhaka on 17 th DEC

    मुघल कालापासून ते ढाक्याच्या मध्यवर्ती भागात अस्तित्वात होते. परंतु पाकिस्तानी फौजेने बंगाली समाजावर जे अत्याचार केले त्या अत्याचारांमध्ये हे मंदिर उध्वस्त केले. 1971 मध्ये पाकिस्तानी फौजेने जे हिंदूंचे शिरकाण केले ते या मंदिरातच…!! पाकिस्तानी फौजेने सुमारे 250 हिंदूंना मारले. परंतु पाकिस्तानी फौजेला भारतीय सैन्यापुढे हार पत्करावी लागली.



    त्यानंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने रमणा काली मंदिर पुन्हा उभे करण्याचे अनेक वर्षे प्रयत्न केले. परंतु त्या प्रयत्नांना त्यावेळी फारसे यश आले नाही. सन 2000 नंतर या प्रयत्नांना पुन्हा वेग आला. 2004 मध्ये त्यावेळेच्या शेख हसीना वाजेद सरकारने हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी दिली.

    परंतु काम अडले. 2007 मध्ये बेगम खालिदा झिया सरकारने परवानगी दिली. परंतु तेव्हाही काम अडले. अखेर हे मंदिर जेथे होते त्या मूळ जागीं न बांधता अन्यत्र बांगलादेश सरकारने रमणा काली मंदिरासाठी अडीच एकर जागा उपलब्ध करून दिली.

    2016 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बांगलादेशच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर या मंदीराच्या कामाला वेग आला. भारताने या मंदिराचं बांधकाम खर्च केला आहे.

    आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यात 17 डिसेंबर रोजी रमणा काली मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या परिसरात राम आणि कृष्ण मंदिरे देखील आहेत. या सर्व परिसराचे नूतनीकरण झाले असून त्याचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकारी उपस्थित राहणार आहेत.

    President Ramnath Kovind to inaugurate Ramna Kali Temple in Dhaka on 17 th DEC

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Election Commission : निवडणूक आयोगाने म्हटले- मतदार यादी बनवणे आणि बदलणे आमचे काम, SIR करणे हा विशेष अधिकार

    PM Modi : मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या 2 वर्षांनंतर पंतप्रधानांचा दौरा; चुराचंदपूरमधील मदत शिबिरात पोहोचले, इम्फाळमधील हिंसाचार पीडितांना भेटले

    ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर; भारतात GST कमी केल्याने स्वस्ताईची लहर!!