वृत्तसंस्था
लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना कोणी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे…?? नवे खुद्द मायावतींनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.President Mayawati ?? : Mayawati offered for the presidency ??; Mayawati ruled out the possibility
उत्तर प्रदेशात भाजपला छुपे सहकार्य करण्याच्या बदल्यात मायावतींना राष्ट्रपती पदाच्या पदाची ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. या बातम्या पसरवण्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. राष्ट्रपतीपदाची ऑफर मी स्वीकारणे म्हणजे स्वतःच्याच बहुजन समाज पार्टीचा अंत घडवून आणणे होय. त्यामुळे अशी कोणतीही ऑफर मला आलेली नाही आणि ती मी स्वीकारणार नाही, असे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
बसपाची कार्यकारणी बरखास्त
त्याच वेळी मायावती यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीची निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बहुजन समाज पक्षाची बैठक घेतली. त्यामध्ये उत्तर प्रदेशसह सर्व कार्यकारणी बरखास्त करून टाकली. फक्त प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना सध्या तरी पदावर कायम ठेवले आहे.
मात्र भविष्यात संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती मायावती यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे. ते उत्तर प्रदेश मधल्या जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जाऊन फक्त संघटनेचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणमीमांसा करतील.
President Mayawati ?? : Mayawati offered for the presidency ??; Mayawati ruled out the possibility
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर
- पडळकरांचा गनिमी कावा : पवारांच्या घराणेशाहीला विरोध करत सांगलीत अहिल्यादेवी स्मारकाचे मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन!!
- ३१ मार्चपासून काँग्रेसचे ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलन सप्ताह नाना पटोले यांची घोषणा
- ST Strike : अजित पवारांचा अल्टिमेटम एसटी कर्मचा-यांनी धुडकावला; संप सुरूच ठेवणाच्या निर्धार!!