• Download App
    President Murmu: राष्ट्रपती मुर्मू यांची 'सुखोई फायटर जेट'द्वारे भरारी; आसाममधील तेजपूर एअरबेसवरून केले उड्डाण!President Droupadi Murmu takes sortie on the Sukhoi 30 MKI fighter aircraft

    President Murmu: राष्ट्रपती मुर्मू यांची ‘सुखोई फायटर जेट’द्वारे भरारी; आसाममधील तेजपूर एअरबेसवरून केले उड्डाण!

    अशाप्रकारची कामगिरी करणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज(शनिवार) आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाद्वारे भरारी घेतली. राष्ट्रपीत मुर्मू या या लढाऊ विमानातून उड्डाण घेतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. President Droupadi Murmu takes sortie on the Sukhoi 30 MKI fighter aircraft

    लष्कराच्या लडाऊ विमानाद्वारे उड्डाण करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत. या अगोदर भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी २००९ मध्ये अशी कामगिरी केलेली आहे. याशिवाय, एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनीही भारताचे राष्ट्रपती असताना, पुणे येथील IAF स्टेशनवर सुखोई 30 लढाऊ विमानांमध्ये अशाच प्रकारचे उड्डाण केले होते.

    राष्ट्रपती मुर्मू या ६ ते ८ एप्रिल दरम्यान आसामच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून तेजपूर हवाई दलाच्या स्थानकावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या आसाम दौऱ्यासाठी गुरुवारी दुपारी गुवाहाटी येथे पोहोचल्या, तेव्हा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. याशिवाय, राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल गुलाबचंद कटारिया हेही विमानतळावर उपस्थित होते.

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी गुवाहाटीमध्ये गजराज महोत्सव-2023 चे उद्घाटन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, निसर्ग आणि मानवता यांचे पवित्र नाते आहे. जे काम निसर्ग आणि पशु-पक्षी यांच्या हिताचे आहे, ते मानवतेच्याही हिताचे आहे. ते पृथ्वी मातेच्याही हिताचे आहे. तत्पूर्वी त्यांनी हत्तींना खायला दिले आणि कांजिरंगा राष्ट्रीय उद्यानात जीप सफारीचा आनंद घेतला. राष्ट्रपतींनी हत्तींशी दयाळूपणे वागण्याचे आवाहन केले, त्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी त्यांचे कॉरिडॉर अडथळेमुक्त ठेवा, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

    President Droupadi Murmu takes sortie on the Sukhoi 30 MKI fighter aircraft

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची