वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आणि उपराष्ट्रपती रहे अमरुल्लाह सालेह यांना तालिबानने एक ऑफर दिली.या दोन्ही नेते अफगाणिस्तानमध्ये परत येऊ शकतात,असेही म्हटलं आहे. President Ashraf Ghani can return to Afghanistan; Offer from Taliban
तालिबाने नेते खलील उर रहमान हक्कानीने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्राध्यक्षांना ही ऑफर दिली. अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांच्याशी आमचे वैर नसल्याचे म्हटलं आहे.
अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि हमदुल्लाह मोहिब यांना तालिबानने माफ केले आहे, असेही हक्कानी यांनी सांगितलं. अगदी तालिबानविरोधात लढणारे सैनिक किंवा अफगाणिस्तानमधील विरोध करणारे नागरिक या सर्वांना आम्ही माफ केलं आहे, असे हक्कानीने सांगितलं आहे. अफगाणिस्तानमधील लोकांचा सूड उगवणार आहे अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप हक्कानीने केला. अफगाणिस्तानमधील नागरिक, ताजिक्स, बलूच, हजारा आणि पश्तून जामातीमधील सर्व नागरिक बंधू असल्याचंही हक्कानीने म्हटलं आहे.
President Ashraf Ghani can return to Afghanistan; Offer from Taliban
महत्त्वाच्या बातम्या
- तालीबान्यांच्या ताब्यात आहे तब्बल १ ट्रिलीयन डॉलर्सचा खनिजांचा साठा, तांबे, लोखंड, लिथियमसह अनेक खाणी
- लसीकरणाने गती घेतली नाही तर… दुसऱ्या लाटेपेक्षा कोरोनाची तिसरी लाट विक्राळ असेल
- कन्नौजमध्ये सापडला खजिना! रायपूर टेकडीच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांनी भरलेला कलश घेऊन जेसीबी चालक गेला पळून
- पाकधार्जिणे लोक पंजाब काँग्रेसमध्ये असावे का? मनीष तिवारी यांचा नवज्योतसिंग सिध्दू यांना घरचा आहेर
- टीशर्टवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहिणाऱ्या युवकाला अटक,राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल