विशेष प्रतिनिधी
काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे आज उद्घाटन झाले. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. सायंकाळी गंगेची महाआरती करण्यात आली. लेझर शो झाला. आता उत्सव समारंभातून बाजूला होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्ष महत्वाच्या बैठकांकडे वळवले आहे.Presentation of all BJP Chief Ministers to PM Modi in Kashi today on State Development and Good Governance
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत एका पाठोपाठ एक असे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यांच्या विकास योजनांचे आणि गुड गव्हर्नन्स या विषयावर प्रेझेन्टेशन सादर करतील. या प्रेझेन्टेशनवर बैठकीत व्यापक विचारविनिमय होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व मुख्यमंत्र्यांना विशेष मार्गदर्शन करतील.
आज सकाळी दहा वाजता रुद्राक्ष सेंटरमध्ये ही बैठक सुरू होणार आहे. राज्यांच्या विकास योजना आणि गुड गव्हर्नन्स हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. ही बैठक दीर्घकाळ जाण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर,
त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव, त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री बिहारच्या उपमुख्यमंत्री रमाई देवी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे .पी. नड्डा, राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपापल्या राज्यांमधील विकास कामांची आराखडे आणि योजना घेऊन काशीमध्ये दाखल झाले आहेत. आज उद्या आणि परवा म्हणजे 13 14 आणि 15 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या राज्याच्या विकासाचे मंथन काशी विश्वनाथाचे साक्षीने करणार आहेत.
काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशव्यापी विकासाचे जे मंथन होणार आहे, त्याची सुरुवात भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने होणार आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सहभागी होऊन गव्हर्नन्स अर्थात शासन व्यवस्था याविषयी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या काशीवासात सर्व मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. परंतु त्यामध्ये ग्लॅमरपेक्षा बैठका, विकास कामांचे आराखडे आपापल्या राज्यांच्या धार्मिक पर्यटनाच्या विकास योजना या विषयीची प्रामुख्याने चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती सर्व बाजूंनी विचार करून वेगवान निर्णय घेणे ही आहे. त्यासंदर्भातले महत्त्वाचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी स्वतः या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहेत.
या राज्यांमध्ये जी विशेष महत्त्वाची धार्मिक स्थळे अथवा पर्यटन स्थळे आहेत त्यासंबंधींचा ठोस विकास आराखडा दोन – तीन धार्मिक – पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे, तेथील पायाभूत विकास योजना आखणे आणि त्याविषयीच्या महत्त्वाच्या निर्णयांचे मार्गदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा काशी दौऱ्याचे सार असणार आहे!!
सर्व मुख्यमंत्र्यांनी आज आपापल्या राज्यांमध्ये वरिष्ठ मंत्र्यांबरोबर आणि राज्यातल्या विविध खात्यांच्या सचिवांबरोबर विशेष बैठका घेतल्या. त्यांनी तयार केलेले विकास आराखडे, महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची स्थळांच्या गरजा, तिथले पर्यटन पोटेन्शियल याविषयीची अद्ययावत माहिती सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी करून घेतली आहे.
त्यांचे सादरीकरण सर्व मुख्यमंत्री पंतप्रधानांसमवेत शेअर करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व मुख्यमंत्र्यांची त्यांच्या राज्यांमधील विकासकामांबद्दल आणि योजनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहेत. या चर्चेमधूनच संबंधित राज्यांचे विकास आराखडे अंतिम स्वरूपात येणार आहेत.
Presentation of all BJP Chief Ministers to PM Modi in Kashi today on State Development and Good Governance
महत्त्वाच्या बातम्या
- Inspiring : बिहारच्या भाजप आमदार श्रेयसी सिंहने घेतला सुवर्णवेध, राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव
- कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश
- PM Modi Speech in Kashi Vishwanath : ‘औरंगजेब येतो तेव्हा शिवाजीही उभे राहतात’, जाणून घ्या पीएम मोदींच्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- मग देशात काय सध्या आफ्रिकन लोक राज्य करताहेत काय?; राज ठाकरे यांचा राहुल गांधींना टोला