• Download App
    तरुण पिढीच्या लसीकरणाला प्राधान्य द्या; दिल्ली उच्च न्यायालयाचा सरकारला सल्ला।Prefer vaccination of the younger generation; Delhi High Court advises government

    तरुण पिढीच्या लसीकरणाला प्राधान्य द्या; दिल्ली उच्च न्यायालयाचा सरकारला सल्ला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आपण अनेक तरुणांना गमावलं आहे, याची खंत वाटते. तुम्ही अशांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहात, जे आपलं आयुष्य जगले आहेत, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. तरुण पिढीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. Prefer vaccination of the younger generation; Delhi High Court advises government

    दिल्ली उच्च न्यायालयानं ब्लॅक फंगसची वाढती प्रकरणं आणि उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकारला सुनावलं आहे. केंद्र सरकारनं या मुद्द्यावर स्टेटस रिपोर्ट दाखल केला होता. यावरुन न्यायालयानं अनेक प्रश्न उपस्थित केले.न्यायालयाने म्हटलं आहे की, ‘ आम्ही असं म्हणत नाही, की ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देऊ नये, परंतु लसची कमतरता असल्यास कमीतकमी प्राधान्यक्रम निश्चित करा. कारण, वृद्ध देश चालवणार नाहीत.



    सरकार प्राधान्यक्रम ठरवण्यात अपयशी ठरल आहे. युवकांना प्राथमिकता द्या. त्यांच्यावर भविष्य निर्भर आहे. पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा युवकच देतात? कारण त्यांच्या ऑफिसला याची गरज असतो.

     

     

    लसीकरणावरुनही न्यायालयानं केंद्राला फटकारलं. न्यायालयानं म्हटलं, की केंद्राकडे लशीच उपलब्ध नसताना या सगळ्या घोषणा का केल्या जात आहेत. लशींचा तुटवडा असताना तुम्ही प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा. तुम्ही 60 वर्षांवरील नागरिकांना आधी लस देण्याचा निर्णय का घेतला, हेदेखील आम्हाला माहिती नसल्याचं न्यायालयानं म्हटलं.

    Prefer vaccination of the younger generation; Delhi High Court advises government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य