• Download App
    लखीमपूर घटनेचे भांडवल करून काँग्रेसला फायदा? प्रशांत किशोर म्हणतात- भ्रमात राहू नका! prashant kishor targeted congress over lakhimpur kheri incident know what he said

    लखीमपूर घटनेचे भांडवल करून काँग्रेसला फायदा? प्रशांत किशोर म्हणतात- भ्रमात राहू नका!

    निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्यांना असे वाटते की, लखीमपूर घटनेमुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांचे लगेच पुनरागमन होईल, ते एका गैरसमजात आहेत. प्रशांत किशोर यांच्या मते, दुर्दैवाने, काँग्रेसच्या सखोल समस्येवर तात्कालिक उपाय नाही. कॉंग्रेसचे नाव घेण्याऐवजी पीके यांनी त्यांना जीओपी म्हणजेच ग्रँड ओल्ड पार्टी असे म्हटले आहे. prashant kishor targeted congress over lakhimpur kheri incident know what he said


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्यांना असे वाटते की, लखीमपूर घटनेमुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांचे लगेच पुनरागमन होईल, ते एका गैरसमजात आहेत. प्रशांत किशोर यांच्या मते, दुर्दैवाने, काँग्रेसच्या सखोल समस्येवर तात्कालिक उपाय नाही. कॉंग्रेसचे नाव घेण्याऐवजी पीके यांनी त्यांना जीओपी म्हणजेच ग्रँड ओल्ड पार्टी असे म्हटले आहे.

    काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात सामील होतील असे अंदाज बांधले जात होते. अशा स्थितीत प्रशांत किशोर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते. 2014 मध्ये भाजपच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहून पीके राष्ट्रीय क्षितिजावर चमकले तेव्हापासून त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत गेला. प्रशांत किशोर यांना सोबत आणण्यासाठी अनेक राजकीय पक्ष तयार आहेत, हेही कोणापासून लपलेले नाही.

    2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला भाजपसोबत काम केले होते आणि नंतर ते जेडीयूमध्ये सामील झाले आणि पक्षाचे उपाध्यक्ष होते. उत्तर प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी काँग्रेससोबत काम केले. त्यांनी पंजाबमध्ये पक्षाला मदत केली आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्लागार होते.

    याशिवाय त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी, दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एमके स्टालिन, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्यासोबत काम केले आहे.

    prashant kishor targeted congress over lakhimpur kheri incident know what he said

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते