• Download App
    चांद्रयान मोहिमेवर प्रकाश राज यांची टीका, पण त्याच्या लँडिंगची जगभरात उत्सुकता!!; 23 ऑगस्टला लाईव्ह प्रक्षेपण!!|Prakash Raj's criticism of Chandrayaan mission, but worldwide curiosity about its landing!!; Live broadcast on 23rd August!!

    चांद्रयान मोहिमेवर प्रकाश राज यांची टीका, पण त्याच्या लँडिंगची जगभरात उत्सुकता!!; 23 ऑगस्टला लाईव्ह प्रक्षेपण!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : चांद्रयान मोहिमेला अभिनेते प्रकाश राज यांनी विरोध केला त्यामुळे जगभरातल्या नेटीझन्सनी त्यांना ट्रोल केले. तरी देखील संपूर्ण जगभरात चांद्रयान 3 लँडिंगची उत्सुकता प्रचंड वाढली असून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने त्याच्या लँडिंगचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे ठरविले आहे. परवा 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.00 नंतर हे लाईव्ह प्रक्षेपण जगभरात पाहता येईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेले असतील.Prakash Raj’s criticism of Chandrayaan mission, but worldwide curiosity about its landing!!; Live broadcast on 23rd August!!

    मात्र चांद्रयान लँडिंगची बॉलिवूडला देखील प्रचंड उत्सुकता लागली असून मी मुलांबरोबर हे लँडिंग पाहणार आहे असे अभिनेत्री करीना कपूर खान हिने सांगितले.



    चांद्रयान लँडिंग पूर्वी दोन तास आधी यांना संदर्भात सर्व तपासणी आणि चाचण्या केल्या जातील त्यावर आधारित लँडिंग चा निर्णय घेतला जाईल यावर पूर्णपणे नियंत्रण असून लँडिंग साठी अनुकूलता नसेल तर लँडिंग 23 ऑगस्ट ऐवजी 27 ऑगस्ट पर्यंत पुढे देखील ढकलता येऊ शकेल याची शास्त्रीय चाचणी पूर्ण झाली आहे अशी माहिती इस्रोने दिली आहे.

    चंद्रावर स्थित असलेल्या चंद्रयान 2 चा चांद्रयान 3 शी संपर्क झाला असून, वेलकम मित्र म्हणून चांद्रयान 2 ने चांद्रयान 3 चे स्वागत देखील केले आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या भूमीपासून 125 किलोमीटर अंतरावरून चंद्रभोवती फेऱ्या मारत आहे.

    प्रकाश राज यांना नेटीझन्सनी अभिनेत्याला धुतले!!

    तत्पूर्वी, चांद्रयान मोहिमेला प्रकाश राज यांनी टोकले, नेटीझन्सी अभिनेत्याला धू धू धुतले. असे आज घडले. चांद्रयान 3 दोनच दिवसांमध्ये चंद्रावर उतरणार असताना अभिनेता प्रकाश राज यांनी चांद्र यान मोहिमेची खिल्ली उडवली. भारतीय अवकाश विकास संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचे एक व्यंगचित्र शेअर करून प्रकाश राज यांनी त्यांना चहावाला दाखवले आणि एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के. सिवन यांची खिल्ली उडवली.

    त्यामुळे देशा परदेशातले नेटीझन्स प्रचंड चिडले आणि त्यांनी प्रकाश राज यांना सोशल मीडियावर धू धू धुतले. रशिया चीन यांच्यासारख्या विकसित देशांच्या चंद्र मोहिमा अपयशी ठरत असताना भारताची चांद्र मोहीम यशस्वी ठरते आहे. यामुळे प्रकाश राज यांना पोटदुखी झाल्याचे शरसंधान अनेकांनी साधले आहे.

    या माणसाला भारताचे चांगले घडलेले काही बघवतच नाही, असे दुसऱ्याने स्पष्ट म्हटले आहे. भारताने तुटपुंज्या साधनांच्या आधारे आपली चांद्र मोहीम यशस्वी केली. याचा समस्त भारत यांना अभिमान वाटतो. पण केवळ मोदी द्वेषामुळे हा माणूस आंधळा झाला आहे, अशी टीका तिसऱ्या व्यक्तीने केली. प्रकाश राज यांनी चांद्र मोहिमेवर केलेली टीका अशा पद्धतीने अंगलट आली.

    अनेक अडचणी पार करून भारताने विकास साधला. पण प्रकाश राज यांच्यासारख्या व्यक्तीला तो विकासही बघवत नाही, असे टीकास्त्र अनेकांनी सोडले आहे.

    Prakash Raj’s criticism of Chandrayaan mission, but worldwide curiosity about its landing!!; Live broadcast on 23rd August!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही