विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रकाश आंबेडकर आले, राहुल गांधींच्या व्यासपीठावर, पण अजूनही खात्री नाही महाराष्ट्रात एकत्र लढण्यावर!!, हे राजकीय सत्य प्रकाश आंबेडकरांच्या तोंडूनच आज बाहेर आले. Prakash Ambedkar came to Rahul Gandhi’s platform
प्रकाश आंबेडकर आज राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर व्यासपीठावर जरूर आले. त्यांनी बाकीच्या नेत्यांबरोबरच व्यासपीठावरून भाषण देखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी वैयक्तिक टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लग्न झाले असूनही ते पत्नी बरोबर राहत नाहीत. हा हिंदू संस्कार नाही. तो संस्कार संघाने त्यांना सांगितला पाहिजे, असा टोमणा प्रकाश आंबेडकरांनी मोदींना हाणला.
पण त्याचवेळी प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन लढतील याची खात्री देऊ शकले नाहीत. उलट आम्ही सोबत लढू किंवा वेगवेगळे लढू, पण लढावे तर लागेलच, असे सांगून प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी बरोबर वंचित आघाडीची युती किंवा आघाडी होण्याची शक्यताच सौम्य शब्दात फेटाळून लावली.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर राहुल गांधींच्या व्यासपीठावर आले त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचे समाधान झाले, पण प्रत्यक्ष मोदी विरोधी लढत निवडणुकीच्या मैदानात प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबरच राहतीलच, याची कुठलीही खात्री महाविकास आघाडीचे इतर नेतेही देऊ शकले नाहीत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भाषणात देखील तसा कुठलाही उल्लेख आला नाही.
Prakash Ambedkar came to Rahul Gandhi’s platform
महत्वाच्या बातम्या
- DRPPL : धारावी पुनर्विकास सर्वेक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींची धारावीत जाऊन अदानींविरुद्ध चिथावणी!!
- भारताने UN मध्ये ‘इस्लामफोबिया’च्या ठरावावर मतदानापासून राखले अंतर
- आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये १९ एप्रिलपासून विधानसभा निवडणुका
- निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…