वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटकात प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कॅण्डल प्रकरणात स्वतः प्रज्ज्वल रेवण्णा फरार झाला असला तरी त्याचे वडील आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज बंगलोर कोर्टाने फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी एच. डी. रेवण्णा यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.Prajwal Revanna sex scandal: Deve Gowda son and Prajwal father HD Revanna in police custody!!
प्रज्वल रेवण्णा हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. रेवन्नाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक प्रज्वल एच. डी. देवेगौडा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते. यानंतर एचडी रेवण्णा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपी नेत्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रज्ज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एचडी रेवण्णा यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळल्या.
भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवण्णा आणि त्यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला. प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. अनेक महिलांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात पोलिसांना माहिती दिली आणि तक्रारी दाखल केल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्ज्वल देशाबाहेर पळून गेला. तो जर्मनीत असल्याची चर्चा आहे.
प्रज्वल रेवण्णा हा कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीएसचा विद्यमान उमेदवार देखील आहे. त्यांच्या लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यानंतर त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले आणि तेव्हापासून तो लोकांसमोर आले नाहीत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
होलेनरसीपूरचे खासदार एच. डी. रेवण्णा 1994 मध्ये या जागेवरून पहिल्यांदा आमदार झाले. 1999 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र 2004 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. 2018 मध्येही ते मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाले. 2023 मध्येही ते जिंकले, पण त्यांचा पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही.