• Download App
    ‘चांद्रयान-3’च्या लँडरमधून बाहेर आले ‘प्रज्ञान रोव्हर’; १४ दिवस चंद्रावर काय करेल जाणून घ्या Pragyan Rover came out from the lander of Chandrayaan 3 Find out what 14 days will do on the moon

    ‘चांद्रयान-3’च्या लँडरमधून बाहेर आले ‘प्रज्ञान रोव्हर’; १४ दिवस चंद्रावर काय करेल जाणून घ्या

    भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा पहिला देश ठरला आहे.

    विशेष बातमी

    नवी दिल्ली : भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. असे केल्याने,  भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या कोणत्याही भागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. भारतापूर्वी, फक्त अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर सॉफ्टलँडिंग केले आहे. Pragyan Rover came out from the lander of Chandrayaan 3 Find out what 14 days will do on the moon

    बुधवारी संध्याकाळी 6.40 वाजता चांद्रयान-3 चे लँडर उतरले. दोन तास 26 मिनिटांनंतर रोव्हरही लँडरमधून बाहेर आला. रोव्हर हा सहा चाकांचा रोबोट आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. त्याच्या चाकांवर अशोक स्तंभाची छाप आणि इस्रोचा लोगो आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर फिरत असताना अशोक स्तंभाची छाप आणि इस्रोचा लोगो छापला जाईल. चांद्रयान-3 चे लँडिंग 5.30 वाजता सुरू झाले. रफ लँडिंग अतिशय यशस्वी झाले. यानंतर लँडरने 5.44 वाजता व्हर्टिकल लँडिंग केले. तेव्हा चंद्रापासून चांद्रयान-3 चे अंतर 3 किमी होते.

    चांद्रयान-3 ने आपल्या 20 मिनिटांत चंद्राच्या शेवटच्या कक्षेतून 25 किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. लँडरने संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चंद्रावर पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 ने संदेश दिला – मी माझ्या गंतव्यस्थानी पोहोचलो आहे.

    इस्त्रोच्या म्हणण्यानुसार, विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येताच त्याचा उपयोग होईल. रोव्हर 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करणार आहे. वास्तविक चंद्रावर पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा एकच दिवस असतो. अशा स्थितीत दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर रोव्हरकडे काम पूर्ण करण्यासाठी केवळ 14 दिवसांचा अवधी असेल. या दरम्यान चंद्रावर सूर्यप्रकाश राहील आणि दोघांनाही सौरऊर्जा मिळत राहील. 14 दिवसांनी दक्षिण ध्रुवावर अंधार पडेल. त्यानंतर लँडर-रोव्हर दोन्ही काम करणे थांबवतील.

    Pragyan Rover came out from the lander of Chandrayaan 3 Find out what 14 days will do on the moon

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची