• Download App
    प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला, विरोधकांना टीकेला मुद्दा पुरविला, नंतर खुलासा केला!!|Praful Patel slams Modi, gives opponents a point to criticize, then reveals!!

    प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला, विरोधकांना टीकेला मुद्दा पुरविला, नंतर खुलासा केला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना मोदींना जिरेटोप घातला. त्यातून विरोधकांना विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि संभाजी ब्रिगेडला टीकेसाठी मुद्दा पुरविला. नंतर खुलासा केला.Praful Patel slams Modi, gives opponents a point to criticize, then reveals!!

    प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्याला 24 तास उलटून गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा केला.



    प्रफुल पटेल यांचा खुलासा

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ, असे ट्विट प्रफुल पटेल यांनी केले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पटेलांवर टीका 

    जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट केले.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधानांनी प्रफुल्ल पटेल यांचे दाऊद आणि इकबाल मिर्चीसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच प्रफुल्ल पटेलांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप नरेंद्र मोदीच्या डोक्यावर चढवला. आम्ही कुणाला देखील जिरेटोप देत नाही. प्रफुल्ल पटेल यांना हा अधिकार कुणी दिला??, नरेंद्र मोदी आणि प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचं संजय राऊत म्हणाले.

    Praful Patel slams Modi, gives opponents a point to criticize, then reveals!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य