महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर! 1,92,936 यशस्वी इंस्टॉलेशन्स Pradhan Mantri Surya Ghar Yojana
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा शुभारंभ 13 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 10 मार्च 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.09 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. याकरिता मोदींचे मन:पूर्वक आभार. Pradhan Mantri Surya Ghar Yojana
या एकूण इंस्टॉलेशन्सपैकी महाराष्ट्राने 1,92,936 इंस्टॉलेशन्स पूर्ण करून देशात दुसरे स्थान मिळवले आहे. 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. आगामी काळातही महाराष्ट्र आपले महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.
मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 56,000 हून अधिक ग्राहकांनी सूर्यघर योजनेत अर्ज केले आहेत.
14,000 ग्राहकांनी रुफ टॉप यंत्रणा इन्व्हर्टरसह बसविली आहे. राज्यात पंतप्रधान सूर्यघर योजना अतिशय प्रभावीपणे राबविली जाते आहे. या योजनेत केवळ मोफत वीज मिळणार नाही, तर अतिरिक्त वीज विकून पैसे सुद्धा कमाविता येणार आहे.
Pradhan Mantri Surya Ghar Yojana Installation of 10.09 lakh solar power projects completed
महत्वाच्या बातम्या