• Download App
    पंतप्रधान मुद्रा योजनेने ३४ कोटींहनू अधिक व्यावसायिकांना दिला आधार, १८.६० लाख कोटी रुपयांची दिली कर्जे|Pradhan Mantri Mudra Yojana provides loans to more than 34 crore businessmen, loans of Rs 18.60 lakh crore

    पंतप्रधान मुद्रा योजनेने ३४ कोटींहनू अधिक व्यावसायिकांना दिला आधार, १८.६० लाख कोटी रुपयांची दिली कर्जे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत गेल्या सात वर्षांमध्ये १८.६० लाख कोटी रुपयांची ३४.४२ कोटी कर्जे मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बिगर कॉपोर्रेट क्षेत्रातील अकृषक प्रकारच्या लघु आणि सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पुरविण्याच्या उद्देश या योजनेचे होते.Pradhan Mantri Mudra Yojana provides loans to more than 34 crore businessmen, loans of Rs 18.60 lakh crore

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी मुद्रा योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेतून दिल्या गेलेल्या एकूण कर्जांपैकी ६८% कर्जे महिलांना देण्यात आली आहे. तर, २२% कर्जे, मुद्रा योजना सुरु झाल्यापासून कोणतेही कर्ज न घेतलेल्या नव्या उद्योजकांना देण्यात आली आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेतून दिल्या गेलेल्या एकूण कर्जांपैकी ५१% कर्जे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत.



    २५ मार्च २०२२ पर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली ३.०७ लाख कोटी रुपयांची ४.८६ कर्जे विद्यमान आर्थिक वषार्साठी विस्तारित करण्यात आली आहेत. प्रत्येक कर्ज प्रस्तावाची सरासरी किंमत ५४ हजार रुपये एवढी असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

    मुद्रा योजनेतून देण्यात आलेल्या कर्जांपैकी सुमारे २३% कर्जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील कर्जदारांना देण्यात आली. तर, २८% कर्जे इतर मागासवगीर्यांतील कर्जदारांना देण्यात आली. जवळपास ११% कर्जे अल्पसंख्याक समुदायातील कर्जदारांना देण्यात आले आल्याचे मंत्रालयकडून सांगण्यात आले आहे.

    Pradhan Mantri Mudra Yojana provides loans to more than 34 crore businessmen, loans of Rs 18.60 lakh crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार