• Download App
    प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा |Pradhan Mantri Garib Awas Yojana sanctioned only ten houses to Muslims in Uttar Pradesh; Strange claim of Asaduddin Owaisi

    प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर; असदुद्दीन ओवैसी यांचा अजब दावा

    वृत्तसंस्था

    लखनऊ : प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून उत्तर प्रदेशात मुसलमानांना फक्त दहा घरे मंजूर केल्याचा अजब दावा आयएआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज केला आहे.Pradhan Mantri Garib Awas Yojana sanctioned only ten houses to Muslims in Uttar Pradesh; Strange claim of Asaduddin Owaisi

    उत्तर प्रदेश निवडणुकीनिमित्त त्यांनी एका पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ सरकारवर विविध विषयांवर टीका केली. त्यावेळी त्यांनी हा अजब दावा केला. ओवैसी म्हणाले, की उत्तर प्रदेशात प्रधानमंत्री गरीब आवास योजनेतून सहा लाख घरे मंजूर करण्यात आली. त्यापैकी फक्त दहा घरे मुसलमानांना देण्यात आली.



    उत्तर प्रदेशात शाळांमधून मुस्लिमांचा 60 टक्के ड्रॉप आऊट असल्याचे सांगण्यात आले, जर हे खरे असेल तर ही सरकारची कामगिरी कोणत्या निकषांमध्ये चांगले म्हणायची?, असा सवाल ओवैसी यांनी केला.

    अल्पसंख्यांक विकासासाठी सोळाशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात राज्यात अल्पसंख्यांकांच्या विकास योजनांवर फक्त 16 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा दावाही ओवैसी यांनी केला.

    Pradhan Mantri Garib Awas Yojana sanctioned only ten houses to Muslims in Uttar Pradesh; Strange claim of Asaduddin Owaisi

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार