• Download App
    ...अन् डार्लिंग प्रभासने पूर्ण केली 'त्याची' अंतीम इच्छा;एका तासाच्या भेटीने दिले 10 दिवसांचे जीवनदान ! prabhas rushed to hospital to meet fan who is cancer patient supposed to die ext 2 hour

    …अन् डार्लिंग प्रभासने पूर्ण केली ‘त्याची’ अंतीम इच्छा;एका तासाच्या भेटीने दिले १० दिवसांचे जीवनदान

     

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:प्रभास एक सुपरस्टार असला तरीही तो प्रचंड संवेदनशील आहे. कदाचित त्याच्याइतका विनम्र आणि दयाळू कोणीही नाही. आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असणार्या एका फॅनने विनंती केली आणि प्रभास शूटींग सोडून त्या फॅनला भेटायला पोहोचला. prabhas rushed to hospital to meet fan who is cancer patient supposed to die ext 2 hour

    सुप्रसिद्ध बिझनेसमॅन वेम्पा कासी राजू यांनी अलीकडे एका मुलाखतीत ही घटना सांगितली.राजू हे प्रभासच्याच भीमावरम या गावचे आहेत. राजू यांनी ही घटना सांगितली आणि सगळेच पुन्हा एकदा प्रभासच्या प्रेमात पडले. 20 वर्षाचा हा मुलगा प्रभासचा मोठा चाहता होता आणि रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.

    कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर असलेल्या या मुलाने प्रभासला भेटायची त्याची अंतिम इच्छा व्यक्त केली होती. प्रभासला ही गोष्ट कळली आणि वेळ न घालवता अगदी शूटींग अर्धवट सोडून तो आपल्या या फॅनला भेटायला रूग्णालयात पोहोचला.

    तासाभराच्या आत प्रभास आपल्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या फॅनसमोर होता. प्रभास त्याला भेटला, प्रेमाने त्याच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि तासभर त्याच्यासोबत मस्तपैकी गप्पाही मारल्या. तू माझी कधीही आठवण कर, मी जिथे कुठे असेन तिथून तुझ्या भेटीला येईल, असे वचन देऊनच तो बाहेर पडला.

    राजू यांनी सांगितल्यानुसार, कॅन्सरशी लढत असलेल्या त्या मुलाकडे फक्त दोन तास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण प्रभासला भेटल्यानंतर तो 10 दिवस जगला. प्रभासच्या तासाभराच्या भेटीने त्या मुलाला 10 दिवसांचे जीवनदान मिळाले.कदाचित याचमुळे प्रभासला इंडस्ट्रीत डार्लिंग म्हणून ओळखले जाते.
    असेच अनेक किस्से आहेत ज्यामुळे प्रभास चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.

    prabhas rushed to hospital to meet fan who is cancer patient supposed to die ext 2 hour

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज