Wednesday, 14 May 2025
  • Download App
    तालीबानचा शक्तीशाली नेता शिकलाय भारताील मिलीटरी अ‍ॅकॅडमीत, शेरू नावाने होते प्रसिध्द, जुने सहकारी सांगतात अतिरेकी विचारांचे नव्हते|Powerful Taliban leader learned from Indian military academy, known as Sheru, old colleagues say not extremist

    तालीबानचा शक्तीशाली नेता शिकलाय भारताील मिलीटरी अ‍ॅकॅडमीत, शेरू नावाने होते प्रसिध्द, जुने सहकारी सांगतात अतिरेकी विचारांचे नव्हते

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: तालीबान म्हटल्यावर डोंगरदºयात राहणारे धर्मांध दहशतवादी समोर येतात. पण तालीबान्यांमध्येही शिक्षित आहेत. त्यांच्या नेत्यांर्पीिं काही जण हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यातील एक नेता तर भारतातील मिलीटरी अ‍ॅकॅडमीचा विद्यार्थी आहे.Powerful Taliban leader learned from Indian military academy, known as Sheru, old colleagues say not extremist

    शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई हे तालिबानच्या टॉप कमांडरपैकी आहेत.  शेर मोहम्मद यांचेशिक्षण भारतामध्ये झालं आहे. तालिबानच्या सात सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई हा देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमी   मध्ये कॅडेट होते. आर्मीचे शिक्षण शेर मोहम्मद यांनी  भारतात घेतलं आहे. आयएमएच्या 1982 च्या तुकडीतील 60 वर्षीय स्टॅनिकझाईला त्याच्या साथीदारांनी शेरू असे नाव त्यांना दिले आहे.



    शेरी  असं नाव दिलें होतं. आयएमएच्या त्या तुकडीतील त्याचे सोबती सांगतात की, स्टनिकझाई तेव्हा धर्मांध किंवा धार्मिक विचारांचाही नव्हता. भगत बटालियनच्या कॅरेन कंपनीत ४५ जेंटलमॅन कॅडेट्ससह स्टनिकझाई आले तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते.

    निवृत्त मेजर जनरल डीए चतुवेर्दी हे त्याचे बॅचमेट होते. ते सांगतात की, स्टनिकझाई प्रत्येकाला आवडायचा, तो एकदम मनमिळावू होता. त्याला मोठ्या मिशा होत्या, त्यामुळे तो अकादमीच्या इतर कॅडेट्सपेक्षा मोठा दिसायचा. त्यावेळी त्यांचे विचार धर्मांध नव्हते. तो इतर अफगाणी कॅडेटसारखा होता.

    स्टनिकझाईने मागील तालिबान राजवटीत परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, तालिबानच्या वतीने राजनैतिक चचेर्साठी बिल क्लिंटन यांची भेटही घेतली आहे. 2015 मध्ये स्टनिकझाईची कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्टनिकझाई उच्च शिक्षित असल्यामुळे तालिबानमध्ये त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

    Powerful Taliban leader learned from Indian military academy, known as Sheru, old colleagues say not extremist

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!