प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 महिने सत्तेबाहेर राहावे लागले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे “सत्य” अखेर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून बाहेर आले. पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा जाहीर करताना सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि विकासासाठी सत्ता आवश्यकच आहे, असे वक्तव्य केले.Power is must for NCP, says sinner MLA manikrao kokate
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अजितदादांच्या बंडाची आणि राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा महाराष्ट्रात जोरावर आहे. त्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट भाजपला जबाबदार ठरवत आहे. किंबहुना शिवसेनेत ईडी आणि सीबीआय या यंत्रणांच्या आधारे जशी भाजपने फूट पाडली, तशीच फूट राष्ट्रवादीत पाडण्यासाठी भाजप यंत्रणांचा गैरवापर करतो आहे, असा आरोप खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी केला. नागपूरच्या वज्रमूठ सभेत देखील या आरोपांचे पडसाद उमटले. यातून भाजप बाकीचे सर्व विरोधी पक्ष फोडण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय हत्यारांचा वापर करत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
परंतु प्रत्यक्षात माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून राष्ट्रवादीचे “राजकीय सत्य” बाहेर पडले. सत्तेशिवाय शहाणपण नाही. विकास कामांसाठी सत्ता हाच एक पर्याय आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सरकारमध्ये असणे महत्त्वाचे आहे. अजितदादा पक्षाला विचारूनच सर्व निर्णय घेतील. अजितदादा हेच सध्या पक्षातले सगळ्यात विधिमंडळातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना सर्वाधिकार आहेत. अजितदादा बाहेर पडले, तर राष्ट्रवादीच उरणार नाही, असे वक्तव्य आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये भाजपचे महाराष्ट्रात 10 – 15 खासदार येतील. त्यामुळे राष्ट्रवादीची गरज भाजपला लागेल, असा दावाही केला आहे.
मात्र याच पत्रकार परिषदेत सत्तेशिवाय शहाणपण नाही हे वाक्य उच्चारून माणिकराव कोकाटे यांच्या तोंडी राष्ट्रवादीतले सत्यच बाहेर आले आहे आणि हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे. भाजप राष्ट्रवादीला फोडण्यासाठी पुढे सरसावण्याऐवजी राष्ट्रवादीच स्वतःहून फुटण्यासाठी पुढे येत आहे हेच सत्य उघड झाले आहे.
भाजप इतर पक्ष फोडण्यापेक्षा भाजपची सत्ता महाराष्ट्रात स्थिरावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाच सत्तेत जायचे असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही हेच यातून स्पष्ट झाले आहे. शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट चोखाळली असली तरी अखेर सत्तेसाठी त्यांनी पुन्हा काँग्रेसशीच जुळवून घ्यावे लागले. पण आता काँग्रेसशी जुळवून घेऊनही पुन्हा सत्तेचा मार्ग खुला होणार नाही. भाजपला वगळून महाराष्ट्रात सत्ता स्थापनही होऊ शकणार नाही ही राजकीय अपरिहार्यता राष्ट्रवादीच्या सर्वच नेतृत्वाच्या लक्षात आल्याचे माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य हे निदर्शक आहे!!
Power is must for NCP, says sinner MLA manikrao kokate
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : गँगस्टर अतिक अहमदच्या 44 वर्षांच्या गुन्ह्यांची कहाणी, दहशतीचा एका मिनिटात झाला अंत
- अतीकच्या हत्येने तुटला “तो” धागा; अतीक तपास यंत्रणांना देणार होता ISI – दहशतवादी गटांच्या nexus ची माहिती!!
- प्रयागराज मधील दहशतीचा अंत; अतीक अहमद, अशरफ अहमद यांची तिघांकडून निर्घृण हत्या; अतीक आयएसआय, लष्कर ए तैय्यबाशी संबंधी देणार होता माहिती!!
- BREAKING NEWS : माफिया डॉन अतिक अहमदची भाऊ अशरफसह गोळ्या झाडून हत्या!