पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा झाला आहे. कोरोना नंतर तब्बल 2 वर्षांनी पंतप्रधान मोदी हे भारताबाहेर युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. या दौर्याचे महत्त्व केवळ द्विपक्षीय नव्हते, तर पंतप्रधान मोदी भारत – नॉर्डिक संमेलन 2022 मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये सहभागी झाले होते. Power Center for Women Leadership !!; New connect with India
– वैशिष्ट्यपूर्ण नॉर्डिक देश
या नॉर्डिक देशांचे वैशिष्ट्य असे की आर्टिक समुद्राशी संलग्न असलेले उत्तर युरोपातील हे देश आइसलँड, फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन आणि नॉर्वे हे स्वच्छ ऊर्जा, हिरवी ऊर्जा अर्थात ग्रीन एनर्जी आणि गुंतवणुकीची प्रचंड क्षमता यासाठी ओळखले जातात.
सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इतकेच नाही तर सामुद्रिक अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी, ग्रीन हायड्रोजन, शिपिंग, फिशरीज, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर मॅनेजमेंट यामध्ये नॉर्डिक देश मास्टर्स आहेत.
या 5 नॉर्डिक देशांची एकत्रित अर्थव्यवस्था ही रशियाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक म्हणजे 1.8 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. रशियाची अर्थव्यवस्था सध्या 1.5 ट्रिलियन डॉलर एवढी आहे. नॉर्डिक देशांचा या महाव्यवस्थेतच त्यांची प्रचंड क्षमता दडली आहे आणि येथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 2 वर्षांनंतर आपल्या परदेश दौऱ्यासाठी नॉर्डिक देश निवडण्यामागचे राजनैतिक महत्वही दिसून आले आहे.
– 5 पैकी 4 देशांच्या महिला पंतप्रधान
याखेरीज या नॉर्डिक देशांचे सध्याचे वैशिष्ट्य असे 5 पैकी 4 देशांचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व महिलांकडे आहे. त्यामुळे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक वाटाघाटी या महिला पंतप्रधानांशी झाल्या आहेत. त्या द्विपक्षीय तर आहेतच, पण त्याहीपेक्षा नॉर्डिक अर्थात उत्तर युरोपीय देशांच्या महिला नेतृत्वाच्या शक्तिकेंद्राशी 135 कोटी भारतीयांच्या वतीने पंतप्रधान मोदींनी वाटाघाटी केल्या आहेत.
आइसलँडच्या पंतप्रधान कार्टिन जेकब्सडॉटीर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन, फिनलंडच्या पंतप्रधान सना मॅरिन, स्वीडिश पंतप्रधान मॅकडेलेना अँडरसन, या सर्व महिला आहेत तर नॉर्वेचे पंतप्रधान जोनस गोर स्टोर हे पुरुष पंतप्रधान आहेत. एकप्रकारे सर्व नॉर्डिक देश महिला शक्तिकेंद्रीत नेतृत्वाशी निगडित आहेत.
– स्वच्छ उर्जेवरच नेतृत्वाचे पोषण
त्यातही या सर्व महिला पंतप्रधानांचे वैशिष्ट्य असे, की आपापल्या देशात या सर्वजणी ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जी अर्थात हिरवी ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर जनमताचा कौल घेऊन त्या सत्तारूढ झाल्या आहेत. या सर्वांचे वय देखील पन्नाशीच्या आत आहे. म्हणजे राजकारणातला त्यांचा अनुभव पंतप्रधान मोदींनी पेक्षा 20 वर्षांनी कमी आहे. पण एकत्रित अर्थव्यवस्था, जागतिक पातळीवरचे योगदान यांमध्ये हे देश अनेक महत्त्वाच्या देशांना मागे टाकून पुढे गेले आहेत. विशेषतः ऊर्जाक्षेत्रात आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात या देशांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.
अमेरिका युरोप आणि रशिया आणि चीन यापेक्षाही नॉर्डिक देशांचे योगदान पर्यावरण संवर्धन क्षेत्रात अधिक आहे. भारत नॉर्डिक संमेलनात क्लीन अँड ग्रीन एनर्जी या क्षेत्रामध्ये पाचही देशांचे भारताशी करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्डिक देशाच्या दौऱ्याची ही खऱ्या अर्थाने फलश्रुती आहे.
- मोदींच्या नॉर्डिक नेतृत्वाला विशेष भेटवस्तू
- पंतप्रधान मोदींनी आपल्या नॉर्डिक देशांचा दौरा तिथल्या नेतृत्वाला विशेष भेटवस्तू देखील दिल्या. भारतातल्या विविध भौगोलिक भागांचे त्यात वैशिष्ट्य सामावले आहे.
- डेन्मार्कचे क्राऊन प्रिन्स फ्रेडरिक यांना मोदींनी छत्तीसगड चे वैशिष्ट्य असलेली डोकरा बोट भेट दिली.
- डेन्मार्कच्या महाराणी मॅग्रेथ 2 यांना गुजरातच्या कच्छमधील वैशिष्ट्यपूर्ण रोगन पेंटिंगचे वस्त्र भेट दिले.
- डेन्मार्कच्या क्राऊन प्रिन्सेस मेरी यांना मोदींनी वाराणसीचे वैशिष्ट्य असलेला चंदेरी मीनाकारी केलेला पक्षी भेट दिला.
- फिनलंडच्या पंतप्रधान सना मॅरिन यांना मोदींनी राजस्थानी वैशिष्ट्य असलेला ब्रास ट्री भेट दिला.
- नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गोड स्टोर यांना राजस्थानी तराकशी ढाल तलवार भेट दिली.
- डेन्मार्कच्या पंतप्रधानना मोदींनी आधी ओरिसातील पट्टाचित्र भेट दिलेच आहे. यावेळी त्यांनी कच्छच्या एम्ब्रॉयडरीचे पारंपारिक वॉल हँगिंग त्यांना भेट दिले.
- स्वीडनच्या पंतप्रधान मॅकडेलेना अँडरसन यांना मोदींनी जम्मू-काश्मीरचे वैशिष्ट्य असलेला पश्मीना स्टोल भेट दिला.
Power Center for Women Leadership !!; New connect with India
महत्वाच्या बातम्या