• Download App
    गरीबी हटाव आईच्या मृत्यूची सहानभूती यावर "ते" निवडणुका जिंकायचे; हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य Poverty Alleviation "They" won the election on the sympathy of the mother's death

    गरीबी हटाव आईच्या मृत्यूची सहानभूती यावर “ते” निवडणुका जिंकायचे; हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

    वृत्तसंस्था

    चंडीगड : उत्तर प्रदेश उत्तराखंड यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कोणीही काहीही म्हटले तरी भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल, असा दावा हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहे. Poverty Alleviation “They” won the election on the sympathy of the mother’s death

    पत्रकारांशी बोलताना अनिल विज म्हणाले, की पूर्वी भावना भडकावून लोकांकडून मते मिळवली जायची. कोणी गरीबी हटावचा नारा देत 2 – 3 निवडणुका जिंकल्या. त्यानंतर कुणी आले आणि माझी आई मरण पावली आहे मला मते द्या, असे म्हणून निवडणुका जिंकल्या. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे. त्यामुळे आता फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होतील आणि जिंकल्या जातील, असे अनिल विज म्हणाले.

    गरीबी हटावचा नारा दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 च्या निवडणुकीच्या वेळी दिला होता, तर 1985 मध्ये राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निवडणूक लढवली होती. त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस लोकसभेची निवडणूक प्रचंड फरकाने जिंकली होती. या संदर्भात अनिल विज यांनी वक्तव्य केले आहे. मात्र त्यावरून आता राजकीय वर्तुळात वादंग उठण्याची शक्यता आहे.

    Poverty Alleviation “They” won the election on the sympathy of the mother’s death

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक