• Download App
    जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण Posthumous Padma Vibhushan to General Bipin Rawat

    कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत, प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण; सुलोचना चव्हाण, सायरस पूनावाला आणि डॉ हिंमत बावस्कर यांना पद्म सन्मान!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पद्मविभूषण पुरस्कारासाठी चार नावांची निवड करण्यात आली आहे. जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.Posthumous Padma Vibhushan to General Bipin Rawat

    याशिवाय भाजपचे माजी नेते कल्याण सिंह (सार्वजनिक व्यवहार) आणि गीताप्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राधेश्याम खेमका (साहित्य आणि शिक्षण) यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे.

    काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, एसआयआयचे एमडी सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिंपियन नीरज चोप्रा, प्रमोद भगत आणि वंदना कटारिया आणि गायक सोनू निगम यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

    Posthumous Padma Vibhushan to General Bipin Rawat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत