वृत्तसंस्था
अमृतसर : सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात हरमिंदर साहिबमध्ये आज जर्नेलसिंग भिंद्रानवाले समर्थित खलिस्तानी झेंडे फडकलेले दिसले. त्याचवेळी शेतकरी आंदोलनात लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकविणारा दीप सिद्धू देखील हरमिंदर साहिबमध्ये आढळून आला. खलिस्तानी समर्थक दल खालसाने मिरवणूक काढली. Posters of Khalistani separatist Jarnail Bhindranwale, and Khalistani flags seen during an event inside Sri Harmandir Sahib
पंजाबमध्ये फुटीरतावाद उफाळल्यानंतर फुटीरतावाद्यांनी जर्नेलसिंग भिंद्रानवाले यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरावर कब्जा केला होता. तेथून ते अतिरेकी कारवाया करीत होते. जेव्हा या कारवायांनी कळस गाठला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात लष्करी कारवाई करण्याचा धाडसी निर्णय घेतला. लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईस ऑपरेश ब्लू स्टार हे नाव देण्यात आले होते. या लष्करी कारवाईत जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्यासह अनेक अतिरेकी ठार झाले होते.
पंजाबमधील फुटीरतावादी घटक दरवर्षी छोट्या – मोठ्या प्रमाणात ऑपरेशन ब्लू स्टारचा स्मृतिदिन पाळतात. यावेळी या स्मृतिदिन कार्यक्रमात हरमिंदर साहिब या मुख्य वास्तूमध्ये भिंद्रानवाले समर्थकांनी खलिस्तानी झेंडे घेऊन प्रवेश केला. त्यामध्ये लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलनात खलिस्तानी झेंडा फडकविणारा दीप सिध्दू देखील होता. तो सध्या जामीनावर बाहेर आहे.
यावेळी जथ्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये भारतीय लष्कराने शीखांवर अत्याचार केल्याचा दावा केला. त्यांच्या भाषणाच्या वेळी खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली. फुटीरतावादी घटक भिंद्रानवालेंचा नेहमी हुतात्मा म्हणून सन्मान करतात. त्यांचा मुलाचा जथ्थेदार हरप्रीत सिंग यांनी सत्कार देखील केला.
Posters of Khalistani separatist Jarnail Bhindranwale, and Khalistani flags seen during an event inside Sri Harmandir Sahib
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात नुसतेच म्हणताहेत एकरकमी खरेदीस तयार आणि हरियाणा सरकार स्फुटनिक व्ही लसीचे सहा कोटी डोस थेट विकत घेणार
- रशियाने कोरोनाने झालेले मृत्यू लपविले, दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख जादा मृत्यू
- व्हॅक्सीन पासपोर्टला भारताचा विरोध, भेदभाव असल्याचे जी-७ देशांच्या बैठकीत ठणकावले
- नायजेरियाने शिकविला ट्विटरला धडा, राष्ट्राध्यक्षांचे ट्विट डिलीट केल्याने घातली बंदी, भारतीय कंपनी कू च्या आशा पल्लवीत
- पुणे जवळपास अनलॉक : दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत उघडी; सलून, स्पा, उद्याने, जिमही उघडणार