• Download App
    Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला दिले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक । Postal service officer sold secrets to pak spy in honey trap, arrested

    Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक

    भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पाकिस्तानला देण्याचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पुरवल्याप्रकरणी 27 वर्षीय रेल्वे टपाल सेवेच्या अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. या अधिकाऱ्यावर पाकिस्तानी महिला एजंटला कागदपत्रे पुरवल्याचा आरोप आहे. Postal service officer sold secrets to pak spy in honey trap, arrested


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पाकिस्तानला देण्याचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय लष्कराची गुप्त कागदपत्रे पुरवल्याप्रकरणी 27 वर्षीय रेल्वे टपाल सेवेच्या अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. या अधिकाऱ्यावर पाकिस्तानी महिला एजंटला कागदपत्रे पुरवल्याचा आरोप आहे.

    तपासानंतर, अधिकाऱ्याच्या या प्रकरणातील सहभागाच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पथक आरोपींची चौकशी करून या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. भरत भवारी असे आरोपीचे नाव आहे. भारतीय लष्कराची दक्षिणी कमांड आणि राजस्थान स्टेट इंटेलिजन्सच्या मिलिटरी इंटेलिजन्स टीमने या प्रकरणात आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे.

    हनीट्रॅपचा प्रकार

    प्राथमिक तपासाच्या आधारावर आरोपी अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात माहिती शेअर करताना गुप्तचर संस्थेने म्हटले आहे की, जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी भवरी तीन वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस विभागात जॉइन झाला होता. तपास यंत्रणेनुसार, आरोपी किमान चार महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर अधिकारी आणि महिलेमध्ये फेसबुकवर संभाषण सुरू झाले.

    व्हॉट्सअॅप कॉलवर गप्पा

    पाकिस्तानी महिलेने अधिकाऱ्याला व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलही केले. या कथित कॉलद्वारे महिलेने आरोपीला सांगितले होते की, ती पोर्ट ब्लेअरची रहिवासी आहे आणि ती एमबीबीएस करत आहे. परिचय वाढल्यानंतर पाकिस्तानी महिलेने हळूहळू अधिकाऱ्याकडे भारतीय सैन्याशी संबंधित फोटोंची मागणी केली. एवढेच नाही तर तिने आरोपीला जयपूरमध्ये भेटण्याची गळही घातली. एजन्सीने म्हटले आहे की, तिने कथितरीत्या आरोपीला तिची छायाचित्रेही पाठवली. इंडियन ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट,1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Postal service officer sold secrets to pak spy in honey trap, arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र