विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ ही ऑनलाइन व्याख्यानमाला आजपासून सुरु झाली. दिल्ली येथील कोव्हिड रिस्पोन्स टीमच्या पुढाकाराने ही व्याख्यामाला अक्षय तृतीये निमित्त 11 ते 15 मे पर्यंत सुरु राहणार आहे. आज व्याख्यामालेचे पहिले पुष्प ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव आणि जैन मुनी प्रणाम सागर महाराज यांनी गुंफले. Positivity Unlimited sadguru jaggi vasudev jain muni
सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले..
1) कोरोनाच्या संकटात एकमेकाकडे बोटे दाखविण्याची ही वेळ नाही. एक देश म्हणून काम करण्याबरोबर एक मानवता म्हणून काम केले पाहिजे.
2) लॉकडाऊनचे तंतोतंत आणि कठोर पालन केले पाहिजे. केवळ 14 दिवस जर कोणी एकमेकांच्या संपर्कात आला नाही तर कोरोनावर विजय प्राप्त होईल.
3) युद्धजन्य परिस्थिती असताना कोरोना हा शत्रू आहे. पण, तो अदृश्य आहे. त्याचा मुकाबला संताप व्यक्त करून होणार नाही. 140 कोटी जनतेला वैद्यकीय सुविधा आणि अन्य मदत करणे सरकार किंवा एका संघटनेचे काम नाही. संयम आणि एकत्रपणे या संकटाचा मुकाबला केला पाहिजे.
4) यापूर्वी संसर्गजन्य आजार आले. ते प्राणी आणि किटकापासून होत होते. आता मनुष्य हा संसर्गाचा प्रमुख घटक बनला आहे. त्यामुळे कोरोना नाहीसा करण्याची सामूहिक जबाबदारी मानवावरच आहे.
5)सध्या जीवन महत्वाचे आहे. जीवनशैली नाही. या साथीमुळे 20 वर्षांपूर्वीच्या जीवनशैलीकडे मनुष्य चालला आहे. पण, जीवन असेल तर जीवनशैली असेल, हे लक्षात ठेवा.
6) रुग्णालयात वैद्यकीय स्टाफला गैर वैद्यकीय मदतीची जास्त गरज आहे. जसे चहा, नाष्टा, जेवण या साठी युवकांनी पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज आहे.
7) स्वतःचे आरोग्य कसे चांगले राहील, याकडे लक्ष द्यावे. रोगप्रतिकार शक्ती वाढविणे, डोंगर, शेती, हवेशीर ठिकाणे येथे भेटी द्याव्यात.
8) मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी योगिक क्रिया कराव्या. त्याने रोगप्रतिकार शक्ती आणि ऑक्सिजन पातळी आपोआप वाढेल.
9)कोरोनाची कोणतीही लाट आली तरी घाबरून जाऊ नका. त्यासाठी कायम सज्ज रहावे. भुकेने कोणी मारता काम नये. त्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने कार्य करावे.
10) भारतीय संस्कृती महान आहे. मानवता हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. साथी विरोधात एकजुटीने सामना करा.
जैन मुनी प्रणाम सागर महाराज म्हणाले..
1) आजार येणार आहे आणि जाणारही आहे. तुम्ही मन मजबूत बनवा. घाबरू नका मन मजबूत असेल तो रोगी संकटातून मुक्त होतोच.
2) अध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर आजार हा शरीराला होतो. मनाला होत नाही. आता शरीराचा आजार हा मनावर आरूढ होऊ देऊ नका. जो मनस्वास्थ्य गमावतो , तो जीवन हरवून बसतो. आत्मा अमर असून शरीर नाशवंत आहे.
3) प्रत्येकाचे आयुष्य ठरलेले आहे. मृत्यू हा अटळ आहे. जगात कोणीही अमर नाही. त्यामुळे मृत्यूचे भय मनात आणू नका.
4) उपचार महत्वाचा आहे. त्याबरोबर भावना योगचा अभ्यास करा.रुग्ण आणि नातेवाईकांनी कोरोना झाला म्हणून घाबरून जाऊ नये. धीराने घ्या. आजकाल अनेक मृत्यू हे घाबरून होत आहेत.
5) स्वतःला आजारापासून वाचविण्यासाठी सतत जागृत रहा.
6) 100 वर्षात एकदा अशी साथ येते. यापूर्वी आली आहे. तिचा सामना धैर्याने करा.
7)साथी येतात आणि जातात. मनुष्य कायम राहिला असून अजूनही मानवता जिवंत आहे. ती चिरंतर ठेवणे काळाची गरज आहे.
8) जैन समुदायाने मानवावर आलेल संकट मानून मदतीसाठी पुढे यावे.
9) आरोग्यपूर्ण आहोत, असे मनाला नेहमी सांगत राहिले पाहिजे. स्वतः बरोबर दुसरेही स्वस्थ राहतील, याची काळजी घेतली पाहिजे. मैं स्वस्थ हूँ,स्वस्थ हूँ, मैं आत्मा हूँ, असे सतत म्हंटले पाहिजे.
10) जीवनात हरले ते घरी कधीच पोचले नाहीत. शरीरात प्राण जेवढे आहेत तेवढेच आयुष्य आहे. त्यामुळे घाबरून न जाता मी जगणार आहे, असे नेहमी मनात ठेवा.
महत्त्वाच्या बातम्या
Positivity Unlimited sadguru jaggi vasudev jain muni
- Wheat Procurement : केंद्राकडून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ४९,९६५ कोटी रुपये, ३४.०७ लाख शेतकऱ्यांना फायदा
- ठाकरे सरकारचा १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपे म्हणाले, तूर्तास ज्येष्ठ नागरिकांना देणार प्राधान्य
- इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे 6 डोस, मग घडले असे काही…
- पलटवार : जेपी नड्डांचे सोनियांना पत्र, म्हणाले- महामारीच्या काळातील काँग्रेसचे वागणे जनता विसरणार नाही!
- शेतकरी आंदोलनातील गँगरेपचे प्रकरण : योगेंद्र यादवांना माहिती असून पोलिसांना सांगितले नाही, राष्ट्रीय महिला आयोगाने बजावली नोटीस