वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोवाक्सिनचे 1.1 कोटी डोस देण्यात आले, त्यापैकी 4,208 लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तर दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोक संक्रमित झाले.positive after corona vaccination? Statistics from the Union Ministry of Health
कोविशिल्ड लस देशातील 11.6 कोटी लोकांना दिली, त्यापैकी 17,145 पहिल्या डोसनंतर आणि दुसऱ्या डोसनंतर 5014 लोकांना कोरोनाची बाधा झाली.
13 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात 13 कोटीहून अधिक लोकांना लस दिली आहे. त्यापैकी 30 लाख लोकांना 24 तासांत लस देण्यात आली. आतापर्यंत 87 टक्के आरोग्य कर्मचार्यांना लस दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना लस औषध विक्रेत्यांकडे मिळणार नाही. सरकार राज्यांना लस देत राहणार आहे. ही लस केवळ सरकारी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. मंत्रालयाकडून पुढे सांगण्यात आले की ही लस घेण्यासाठी सर्व लोकांना कोविन-अॅपवर नोंदणी करावी लागेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काय म्हंटले…
- देशातील 146 जिल्हे विशेष चिंता निर्माण करणार आहेत.
- 308 जिल्ह्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण आहे.
- सध्या भारतात 21 लाख 57 हजार सक्रीय रुग्ण असून ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.
- रेल्वे 1200 बेड देत असून डीआरडीओने 500 बेड तयार केले. केंद्र सरकारने 2005 बेडमध्ये वाढ केली आहे.
- देशात कोरोना मृत्यूदरही कमी होत आहे.
positive after corona vaccination? Statistics from the Union Ministry of Health
महत्त्वाच्या बातम्या
- Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल
- गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय