वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे अन्यथा देशातली सामाजिक समरसता संपेल आणि त्यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका उत्पन्न होईल, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेताना त्यांनी हा गंभीर इशारा दिला आहे. Population control bill is crucial, we’ve limited resources
केंद्र सरकार लवकरच संसदेत लोकसंख्या नियंत्रण कायदा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांमध्ये देखील हा विषय चर्चेत आहे. आज त्या चर्चेलाच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आवश्यकच आहे. कारण चीनने 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसी आणल्यानंतर त्या देशात जननदर दर एका मिनिटाला 10 मुले असा आहे, तर भारतात दर एका मिनिटाला 30 मुले जन्माला येतात. अशा स्थितीत आपण चीन सारख्या बलाढ्य देशाशी आर्थिक आणि सामरिक मुकाबला कसा करणार?, हा सवाल गंभीर आहे. याकडे गिरीराज सिंह यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी त्यांनी देशातली वाढती लोकसंख्या सामाजिक असंतुलन निर्माण करून देशाच्या एकतेलाच धोका निर्माण करत आहे. कारण अनियंत्रित लोकसंख्येमुळे देशात सामाजिक समरसता संपण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Population control bill is crucial, we’ve limited resources
महत्वाच्या बातम्या
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय