• Download App
    ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; अलाहाबाद हायकोर्टाचा अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका!!|Pooja will continue in the basement of Gnanavapi; Allahabad High Court hits out at Anjumia Intejamia Masjid Committee!!

    ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; अलाहाबाद हायकोर्टाचा अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका!!

    वृत्तसंस्था

    वाराणसी : ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी वाराणसी कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ती परवानगी अलाहाबाद हायकोर्टाने कायम ठेवत अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिलाच, पण मशीद कमिटीच्या अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला आहे Pooja will continue in the basement of Gnanavapi; Allahabad High Court hits out at Anjumia Intejamia Masjid Committee!!

    ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजेनंतर वाराणसीतील मुस्लिम समुदायाने मुस्लिम परिसरात बंद पुकारला त्या बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला पण दरम्यानच्या काळात मुस्लिम पक्ष अलाहाबाद हायकोर्टात पोहोचला पण अलाहाबाद हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.



     

    अलाहाबाद हायकोर्टानं काय म्हटलं?

    ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी झाली.

    यावेळी हायकोर्टानं म्हटलं की, 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आणि मशीद समितीला 6 फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितले. अर्जात सुधारणा केल्यानंतरच या संदर्भात हायकोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे तोपर्यंत ज्ञानवापीच्या तळघरात पूजाअर्चा सुरूच राहणार आहे.

    Pooja will continue in the basement of Gnanavapi; Allahabad High Court hits out at Anjumia Intejamia Masjid Committee!!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Assam Govt : आसाममध्ये 40 लाख महिलांच्या खात्यात ₹9000 हस्तांतरित; 4 महिन्यांचे पैसे एकाच वेळी पाठवले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले- निवडणुकीशी याचा काहीही संबंध नाही

    CBSE Class : CBSEच्या 12वीच्या पेपरवर गाण्याचा क्यूआर कोड; स्कॅन केल्यावर यू-ट्यूब लिंक उघडत आहे, CBSE ने म्हटले- चूक झाली, पण पेपर सुरक्षित

    Chandigarh Firm : अण्वस्त्र आणीबाणीच्या तयारीत खाडीतील देश; चंदीगडमधील औषध कंपनीकडे अणुआपत्तीत उपयुक्त ठरणाऱ्या 1 कोटी कॅप्सूलबाबत विचारणा