• Download App
    नंदीग्राममधले मतदान संपले, विजय – पराभवाचे दावे झाले; निवडणूक आयोगाकडे तृणमूळच्या तक्रारी सुरूच Polling in Nandigram ended, victory-defeat claims were made; Trinamool complaints continue to be lodged with the Election Commission

    नंदीग्राममधले मतदान संपले, विजय – पराभवाचे दावे झाले; निवडणूक आयोगाकडे तृणमूळच्या तक्रारी सुरूच

    वृत्तसंस्था

    नंदीग्राम – हाय व्होल्टेज मतदारसंघ नंदीग्राममधले मतदान संपले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे हेवीवेट उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचे विजय – पराभवाचे दावे – प्रतिदावेही करून झाले, पण तृणमूळ काँग्रेसच्या तक्रारी संपायला तयार नाहीत. Polling in Nandigram ended, victory-defeat claims were made; Trinamool complaints continue to be lodged with the Election Commission

    नंदीग्राममधील काही बूथवर घडलेल्या गैरप्रकारांबद्दल निवड़णूक आयोगाकडे तक्रार करण्याचा विचार आम्ही करतो आहोत, असे तृणमूळचे नेते डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. तृणमूळमध्ये नव्याने सामील झालेले नेते यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जींच्या मोठया विजयाचा दावा केला आहे. त्याचवेळी लोकशाहीविषयी चिंताही व्यक्त केली आहे.

    नंदीग्राम आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसचा विजय निश्चित आहे. तरीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात जे काही घडलेय त्याचा विचार करून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. त्यांनीही लोकशाही वाचविण्यासाठी ही तक्रार करावी लागत असल्याचा दावा केला.

    ममता बॅनर्जींनी काही वेळ मतदान थांबविल्याची तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली होती. पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी सुरूवातीच्या रिपोर्ट्सच्या आधारे ती फेटाळली आहे. याबाबतचा अंतिम अहवाल उद्या सायंकाळपर्यंत मागविण्यात आल्याचे आयोगाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

    Polling in Nandigram ended, victory-defeat claims were made; Trinamool complaints continue to be lodged with the Election Commission

    Related posts

    Pinaka Guided Rocket : भारताच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी; 120 किमी रेंज, लक्ष्यावर अचूक हल्ला केला

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम