• Download App
    EXIT POLL 2024 : मोदींच्या 400 पारच्या खोड्यात INDI आघाडी अडकली; 146 वर आटोपली!! Poll of exit polls : INDI alliance in fix of Modi's 400 paar, remained 146

    EXIT POLL 2024 : मोदींच्या 400 पारच्या खोड्यात INDI आघाडी अडकली; 146 वर आटोपली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीतल्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलच्या विविध आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार हे सुनिश्चित झाले असून कोणत्याही स्थितीत एनडीए 350 पार आणि INDI आघाडी 150 च्या आसपास अशी आकडेवारी स्पष्ट झाली आहे. Poll of exit polls : INDI alliance in fix of Modi’s 400 paar, remained 146

    संपूर्ण देशातले 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या संस्थांबरोबर केलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर केले. या सगळ्या निष्कर्षांचा एक निष्कर्ष म्हणजे एक्झिट पोल “पोल ऑफ पोल्स”चा आकडा काढला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए 366 काँग्रेस प्रणितINDI आघाडी 146 आणि दोन्ही आघाड्यांमध्ये नसलेले इतर छोटे मोठे घटक पक्ष 31 असा आकडा आला.

    अर्थातच नरेंद्र मोदींची अब की बार 400 पार ही घोषणा 44 या आकड्याने कमी पडली. पण 2019 पेक्षा एनडीएला जास्त जागा मिळाल्या. पण त्या पलीकडे जाऊन एक्झिट पोलचा नेमका आढावा घेतला तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आणि त्यांनीच पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या INDI आघाडीला सलग तिसऱ्या निवडणुकीत अपयश आले ही बाब अधोरेखित झाली.

    अब की बार 400 पार असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे सगळे वरिष्ठ नेते यांनी प्रचाराचा दणका उडवला होता. नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांपुढे 400 पार हा बलाढ्य आकडा ठेवून त्यांच्या सगळ्यांच्या पायाला भिंगरी बांधली होती. याचा उपयोग बऱ्याच प्रमाणात झाल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यातून समोर आले.

    त्या उलट राहुल गांधींनी गेल्या वर्ष – दीड वर्षांमध्ये भारत जोडो न्याय यात्रा काढली त्यांनी दक्षिण – उत्तर आणि पूर्व – पश्चिम असा संपूर्ण भारत पालथा घातला. राहुल गांधी यांचीही भारत जोडो न्याय यात्रा अभूतपूर्व होती ते या न्याय यात्रेमध्ये तब्बल 6200 किलोमीटर फिरले. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात या यात्रेचे प्रतिबिंब फारच अपुरे पडले, असे निदान एक्झिट पोलच्या आकड्याने तरी दाखविले आहे. INDI आघाडीला 150 हा आकडा देखील पुरेसा गाठता आला नाही. त्यांचा आकडा 146 वर आटोपला.

    Poll of exit polls : INDI alliance in fix of Modi’s 400 paar, remained 146

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र