• Download App
    Electoral Bonds Data : टीएमसी आणि जेडीयूचे कोट्यवधींच्या देणग्यांवर उडवाउडवीचे उत्तर, म्हटले- ते बाँड कोणी दिले माहीत नाही|Poll bonds were just left at our offices, don’t know by whom, say TMC and JDU

    Electoral Bonds Data : टीएमसी आणि जेडीयूचे कोट्यवधींच्या देणग्यांवर उडवाउडवीचे उत्तर, म्हटले- ते बाँड कोणी दिले माहीत नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँड्सची माहिती सार्वजनिक होताच पक्ष आता देणगीच्या मुद्द्यापासून स्वत:ला दूर करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने, तर त्यांच्या कार्यालयात कोणीतरी हे बाँड ठेवून गेल्याचे सांगितले. टीएमसीचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे बाँड खरेदी करणाऱ्यांची माहिती नाही.Poll bonds were just left at our offices, don’t know by whom, say TMC and JDU

    TMC आणि JDU ने 2018-19 च्या बॉन्डची माहिती नाकारली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 27 मे 2019 रोजी, टीएमसीने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये बाँडबद्दलही बोलले होते. पक्षाने म्हटले आहे की, ‘यापैकी बहुतेक बाँड आमच्या कार्यालयात पाठवले गेले आणि ड्रॉप बॉक्समध्ये ठेवले गेले किंवा आमच्या पक्षाला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्यांना मेसेंजरद्वारे पाठवले गेले.’



    पुढे असे सांगण्यात आले की, ‘बहुतेकांनी निनावी राहणे पसंत केले, त्यामुळे आमच्याकडे खरेदीदारांची नावे आणि इतर माहिती नाही.’

    रिपोर्टनुसार, जेडीयूने 30 मे 2019 रोजी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, ’13 एप्रिल 2019 रोजी पाटणा येथील आमच्या कार्यालयात कोणीतरी आले आणि त्यांनी एक सीलबंद लिफाफा दिला, तो उघडला असता आम्हाला 1 कोटी रुपये किमतीचे 10 निवडणूक रोखे मिळाले. अशा परिस्थितीत, आम्ही देणगीदारांबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाही.

    जेडीयूचेही म्हणणे आहे की, ‘आम्हाला माहिती नाही आणि आम्ही शोधण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नव्हता आणि भारत सरकारची केवळ अधिसूचना होती.’

    जेडीयू आणि टीएमसीला किती देणग्या मिळाल्या?

    तथापि, जेडीयूने एप्रिल 2019 मध्ये 13 कोटी रुपयांपैकी 3 कोटी रुपयांच्या देणगीदारांची माहिती दिली आहे. त्याच वेळी, 16 जुलै 2018 ते 22 मे 2019 दरम्यान निवडणूक बाँडद्वारे सुमारे 75 कोटी रुपये देणाऱ्या देणगीदारांची माहिती टीएमसीने उघड केलेली नाही.

    TMC, ज्याने कोणत्याही देणगीदाराची माहिती दिली नाही, असे म्हटले आहे की त्याची माहिती एसबीआयने जारी केलेल्या बाँडच्या विशिष्ट क्रमांकांवरून मिळू शकते. अहवालानुसार, पक्षाने म्हटले आहे की, ‘आम्ही हेदेखील समजतो की SBI ही एकमेव निवडणूक बाँड योजनेंतर्गत हे बाँड जारी करते. ज्यांना बाँड जारी केले गेले त्यांनी पॅनकार्ड, ओळखपत्र, पत्त्याची माहिती आणि इतर कागदपत्रे प्रदान केलेली असावीत. त्यामुळे आम्हाला देणगी देणाऱ्या सर्व बाँडधारकांची माहिती बँकेकडे आहे.

    Poll bonds were just left at our offices, don’t know by whom, say TMC and JDU

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!