विशेष प्रतिनिधी
मुंबई : नेमके कोण कुणाच्या वाटेवर??, सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर की शरद पवारांकडे उरलेले आमदार काँग्रेसच्या वाटेवर??, या सवालांवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. Political unrest in both the NCPs, as results may upset their fortunes
याला कारणही तसेच घडले. ते असे :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते मेहबूब शेख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे लोकसभा उमेदवार सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला. सुनील तटकरे अजित पवारांबरोबर जाऊन चुकले आहेत. ते इतरत्र आपली राजकीय वाट शोधत आहेत, पण त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर निघाले आहेत. 4 जून नंतर मोठा धमाका होऊन सुनील तटकरे त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले असतील, असा दावा मेहबूब शेख यांनी केला.
हे तेच मेहबूब शेख आहेत, ज्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यावर महाविकास आघाडी सरकारला बरीच सारवासारव करावी लागली होती. शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना आता मोठे स्थान आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्व आहे.
मेहबूब शेख यांनी सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांचे 5 – 6 आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला. शरद पवारांच्या पक्षाला भवितव्य उरले नसल्याने त्यांच्याकडे उरलेले आमदार काँग्रेसमध्ये आपले राजकीय भवितव्य शोधण्यासाठी जाणार आहेत, असे सुनील तटकरे म्हणाले.
महाराष्ट्रातले मतदान संपल्यानंतर शरद पवारांनी आपल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये राजकीय विलीनीकरण करण्याची पुडी सोडली होती. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्याला वेगळे महत्त्व आहे.