विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ कमळाला कोमेजणार राजस्थानात अशोक गहलोत पुन्हा बाजी मारणार तेलंगणा काँग्रेस बीआरएस काँग्रेसवर मात करणार अशा बाता मारलेले निवडणूक पंडित आता गप्प झाले आहेत. कारण मध्य प्रदेश राजस्थान भाजपने काँग्रेसवर आघाडी घेतली आहे. तेलंगणात बीआरएस काँग्रेसवर भारी ठरताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये काट्याची टक्कर आहे.Political pundits’ predictions for semi-finals collapse; BJP wins in Madhya Pradesh, Rajasthan; In Chhattisgarh, BRS is heavy on Congress in Telangana!!
मध्य प्रदेशात भाजप 113, तर काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे, तर राजस्थानात भाजप 104 आणि काँग्रेस 81 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 43 आणि भाजप 35 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणातही काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला 45 तर सत्ताधारी बीआरएसला 63 जागा मिळताना दिसत आहे. भाजप आणि एमआयएम प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर आहे.
आमदार फुटू नये म्हणून
दरम्यान, राजस्थान आणि मध्यप्रदेशात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. या दोन्ही राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना काही आमदार कमी पडण्याची शक्यता आहे. अशावेळी आमदारांची फोडाफोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या संभाव्य आमदारांना घोडेबाजारापासून वाचवण्यासाठी रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसने सर्व उमेदवारांना जयपूर येथे एकत्र जमा होण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी
चारही राज्यात दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने चार राज्यात महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे चारही नेते चारही राज्यांमध्ये गेले आहेत. चारही राज्यात काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एकही आमदार फुटणार नाही याची खबरदारीही या नेत्यांकडून घेतली जाणार आहे. तसेच कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Political pundits’ predictions for semi-finals collapse; BJP wins in Madhya Pradesh, Rajasthan; In Chhattisgarh, BRS is heavy on Congress in Telangana!!
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी