देशभरातील सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. Political mourning in India today for the death of President of Iran Ibrahim Raisi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्यासह सात जणांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. राष्ट्रपती रईसी यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने आज (मंगळवार) एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज देशभरातील सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “भारतभरातील शोकदिनी सर्व सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. यासोबतच देशात कोणताही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.”
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात आकस्मिक निधन हे भारतासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. कारण अध्यक्ष रईसी यांनीच चीन आणि पाकिस्तानच्या दबावाला न जुमानता चाबहार बंदर भारताच्या ताब्यात देण्याचा मार्ग मोकळा केला होता. याशिवाय इराण इस्लामिक देश असूनही रईसी यांनी काश्मीर मुद्द्यावर नेहमीच भारताला पाठिंबा दिला.
उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी भारताने इराणमधील चाबहार येथे असलेल्या शाहिद बेहेश्ती बंदराच्या ऑपरेशन आणि विकासासाठी 10 वर्षांचा करार केला होता. हे बंदर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे बंदर आता भारतासाठी अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांमध्ये पोहोचण्याचा मार्ग बनला आहे.
Political mourning in India today for the death of President of Iran Ibrahim Raisi
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील 37 मशिदींमधून व्होट जिहादचे फतवे; शिवसेनेची निवडणूक आयोग + पोलिसांमध्ये तक्रार!!
- कन्या प्रेमापोटीच पवारांनी राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री केले नाही; अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा आरोप!!
- लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!
- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मोठं विधान