• Download App
    राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक 90 आमदारांचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदासाठी पायलट यांना विरोध|Political Earthquake in Rajasthan 90 pro-Gehlot MLAs resign, oppose Pilot for Chief Ministership

    राजस्थानात राजकीय भूकंप : गेहलोत समर्थक 90 आमदारांचा राजीनामा, मुख्यमंत्रिपदासाठी पायलट यांना विरोध

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधीच आता मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार या भावनेतून गेहलोत समर्थक 90 हून अधिक काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे सोपवल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. गेहलोत काँग्रेस अध्यक्ष झाले, तर सचिन पायलट मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील या भावनेतून गेहलोत समर्थकांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.Political Earthquake in Rajasthan 90 pro-Gehlot MLAs resign, oppose Pilot for Chief Ministership

    त्याआधी गेहलोत यांचे समर्थक नगरविकासमंत्री शांती धारीवाल यांच्या घरी एकत्र आले. सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी बैठकीत सहभागी होण्यास नकार देण्यात आला. रात्री 8 वाजेपर्यंत धारीवाल यांच्या घरी 70 हून अधिक आमदार होते. यादरम्यान, केंद्रीय पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेश प्रभारी अजय माकन जयपूरच्या हॉटेलमध्ये बसून राहिले.



    गहलोत यांनी रात्री त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा व अन्नमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनीही पर्यवेक्षकांची भेट घेतली. धारीवाल यांच्या घरी सर्वांत आधी गहलोत गटातील वरिष्ठ मंत्री व आमदार पोहोचले. यानंतर पक्षासोबत सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना फोन करून बोलवण्यात आले. कोणालाही बैठकीला जाऊ दिले नाही. पाहता पाहता ७० पेक्षा जास्त आमदार गोळा झाले. यामध्ये भाजपमधून बडतर्फ आमदार शोभाराणी यांचाही समावेश होता.

    खाचरियावास यांनी सांगितले की, 2020 मध्ये ज्या आमदारांनी सरकार वाचवले होते, त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करावे. सध्या गहलोत आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही आमचे म्हणणे पक्षाच्या मंचावर मांडू. दुसरीकडे, पायलटही दुपारी दिल्लीहून जयपूरला आले. त्यांच्या निवासस्थानीही समर्थक आमदारांनी गर्दी केली.

    रात्री 8.00 वाजता पायलट गटाचे आमदार खिलाडी बैरवा मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. येथेच विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक आहे. रिटा चौधरी, दिव्या मदेरणा, रघु शर्मा, दीपेंद्र सिंह शेखावत, हरीश मीणा, हेमाराम चौधरी, राजेंद्र गुढा, वाजिब अलीही तेथे पोहोचले.

    गेहलोत यांनी सांगितले की, मी सोनिया गांधी आणि अजय माकन यांच्याकडे 9 ऑगस्ट रोजी राजीनामा देऊ केला होता. नव्या मुख्यमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जो सरकार स्थापन करू शकेल तोच मुख्यमंत्री होईल. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा येणे आवश्यक आहे.

    Political Earthquake in Rajasthan 90 pro-Gehlot MLAs resign, oppose Pilot for Chief Ministership

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!