विरोधी पक्षनेते राहुल गांधींचीही चौकशी होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Police संसदेत हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद संकुलात झालेल्या या घटनेत जखमी झालेले खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओ तपासण्यात येणार आहे. पुरावा म्हणून मीडिया कॅमेऱ्याचे फुटेजही गोळा केले जाणार आहे.Police
फुटेज गोळा करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची परवानगी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खासदारांचे जबाब घेतल्यानंतर आणि फुटेज मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी सीन रिक्रएट करू शकते. राहुल गांधी आणि इतर खासदारांना नोटीस पाठवली जाईल. खासदारांचे जबाब नोंदवल्यानंतर याप्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी केली जाणार आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत भाजप खासदारांवर मल्लिकार्जुन खर्गे यांना धक्काबुक्की केल्याचा आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेसने दाखल केलेल्या या तक्रारीचीही पोलीस चौकशी करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस संसद सचिवालयाला पत्र लिहून कथित घटना घडलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करू शकतात. वरिष्ठ पोलिस अधिकारी हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्याचा विचारही करू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Police will take statements from MPs injured in clash
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!