• Download App
    झारखंड विधानसभेत स्वतंत्र नमाज कक्ष; विधानसभेबाहेर निदर्शने करणाऱ्या हजारो भाजप कार्यकर्त्यांवर वॉटर कॅननचा मारा Police use water cannon against BJP leaders and workers protesting against allotment of room for namaz in Jharkhand Legislative Assembly

    झारखंड विधानसभेत स्वतंत्र नमाज कक्ष; विधानसभेबाहेर निदर्शने करणाऱ्या हजारो भाजप कार्यकर्त्यांवर वॉटर कॅननचा मारा

    वृत्तसंस्था

    रांची – झारखंडमध्ये विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र कक्ष देण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांच्या सरकारने घेतल्यावर त्याला भाजपने कडाडून विरोध केला आहे. विधानसभेत भाजपच्या आमदारांनी या निर्णयाला विरोध केलाच. पण विधानसभेबाहेर देखील भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी निदर्शने करून नमाज कक्षाला विरोध केला. त्यावेळी झारखंडच्या पोलीसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी त्यांच्यावर वॉटर कॅननचा मारा केला. Police use water cannon against BJP leaders and workers protesting against allotment of room for namaz in Jharkhand Legislative Assembly

    विधानसभेत कोणतेही धर्मस्थळ उभे करण्यास भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला. विधानसभेच्या दिशेने हजारो कार्यकर्ते निदर्शने करीत चालले होते. यावेळी पोलीसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. पण निदर्शकांची संख्या मोठी होती. यावेळी पोलीसांनी त्यांच्यावर वॉटर कॅननचा मारा करून निदर्शकांना पांगविण्याचा प्रयत्न केला.

    तत्पूर्वी, झारखंड विधानसभेत नमाज कक्षाला विरोध करत भाजप आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला. आमदारांनी जय श्री रामच्या घोषणा देत तसेच हनुमान चालिसा म्हणत हौद्यात धाव घेतली.

    सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी नमाज कक्षासह राज्य सरकारच्या रोजगार धोरणाला विरोध दर्शवित निदर्शने करण्यास सुरूवात केली. विधानसभा अध्यक्ष रविंद्र नाथ महातो यांनी त्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली.

    झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी खोली देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. मात्र, भाजपने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. हा आदेश मागे घेण्याची भाजपची मागणी आहे.

    Police use water cannon against BJP leaders and workers protesting against allotment of room for namaz in Jharkhand Legislative Assembly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य