विशेष प्रतिनिधी
भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराविरुध्द असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका कलाकाराच्या अटकेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच पोलीसांनी अटक केली. त्यांचे कपडे उतरविण्यात आले. केवळ अंडरवेअरवरील पत्रकारांचे फोटो व्हायरल झाले आहेत.Police take off journalists’ clothes, only underwear photos go viral
2 एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात ही घटना घडली होती. कपडे उतरविलेल्या फोटोमध्ये दिसत असलेले स्थानिक पत्रकार कनिष्क तिवारी यांनी सांगितले की ते थिएटर कलाकार नीरज कुंदर यांच्या अटकेबाबत माहिती घेण्यासाठी गेले होते. कुंदर याने भाजप आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचा मुलगा गुरु दत्त यांच्याबद्दल असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
आम्ही त्याच्या अटकेची चौकशी करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात गेलो होतो. पण आम्हाला पोलिसांनी अटक केली आणि जवळपास 18 तास लॉकअपमध्ये ठेवले. आम्हाला मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि आमचे कपडे काढण्यास सांगण्यात आले.
नीरज कुंदर हे सिधी जिल्ह्यातील इंद्रावती नाट्य समितीचे संचालक आहेत आणि ते विंध्यांची कला वाचवण्यासाठी काम करत असल्याची माहिती आहे. कुंदरने अनुराग मिश्राच्या नावाने बनावट फेसबुक आयडी बनवला होता. त्याला अटक केल्यानंतर कुंदरचे आई-वडील आणि तिवारी यांच्यासह अनेक लोक पोलिस ठाण्यात गेले होते.
नीरज कुंदरच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात गेलेले आणखी एक थिएटर कलाकार नरेंद्र बहादूर सिंग यांनी आरोप केला आहे की या सर्वांना मारहाण करण्यात आली आणि कपडे उतरविण्यास सांगण्यात आले. पोलिसांनी आमच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. पत्रकार कनिष्क तिवारी यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांनी स्थानिक पोलिसांचे तसेच आमदार केदारनाथ शुक्ला यांच्या घोटाळ्यांचा पदार्फाश केला.त्यामुळे पोलीसांनी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक मुकेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, पत्रकार नव्हते तर गैरप्रकार करणारे होते. त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. नंतर अटक करण्यात आली.कनिष्क आणि इतरांना अर्धनग्न दाखवणाऱ्या व्हायरल फोटोबद्दल विचारले असता, एसपी श्रीवास्तव म्हणाले, प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. फोटो कोणी क्लिक करून वितरित केला आहे ते लवकरच सापडेल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Police take off journalists’ clothes, only underwear photos go viral
महत्त्वाच्या बातम्या
- ST Strike : सर्व एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ, पेन्शन, ग्रॅज्युएटी द्या; मुंबई हायकोर्टाचे निर्देश
- मशिदींवरचे भोंगे : अजानच्या भोंग्यांनी ध्वनी प्रदूषण होत नाही; नागपूर जामा मशिदीच्या चेअरमनचा दावा!!
- Sri Lankan Crisis : श्रीलंकेच्या आर्थिक संकटात भारताची मदत; रणातुंगा – जयसूर्या यांनी मानले भारताचे आभार!!
- मनसे पुणे शहराध्यक्ष वसंत माेरेंची पदावरुन हकालपट्टी भाेंगा प्रकरणात पक्षा विराेधात भूमिकेचा ठपका