वृत्तसंस्था
मुंबई : भारत चीन सीमेवरील लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना आपल्या जीवाची बाजी लावून खदेडणाऱ्या भारतीय जवानांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा विरुद्ध मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी रिचा चढ्ढाने केलेल्या एका ट्विट वरून जुहू पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली आहे. मात्र रिचा चढ्ढाने दुसरे ट्विट करून त्यासंदर्भात माफी मागितली आहे. Police case against Richa Chadha for insulting martyrs in Galwan
भारत सरकारने आदेश दिल्यास पाकिस्तान व्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज असल्याचे वक्तव्य लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवताना रिचा चढ्ढा हिने “गलवान सेज इट”, असे एका ओळीचे ट्विट केले होते. गलवान मध्ये चिनी घुसखोरांनी भारतीय जवानांवर हल्ला करून 20 भारतीय जवानांना मारले होते. परंतु त्याच चिनी घुसखोरांना परतवून लावताना भारतीय जवानांनी प्रतिहल्ला करत 42 चिनी जवानांना ठार केले होते. भारतीय जवानांच्या पराक्रमाचा हा इतिहास विसरून रिचा चढ्ढा हिने “गलवान सेज इट” असे खोचक ट्विट करून भारतीय जवानांच्या बलिदानाचा अपमान केला होता.
त्यावरून सोशल मीडियात तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. ही टीकेची झोड पाहून तिने आपल्या आधीच्या ट्विट वरून माफी देखील मागितली आहे. माझे आजोबा चीनविरुद्ध 1962 च्या युद्धात लेफ्टनंट कर्नल म्हणून लढले होते. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावाला दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागते, असे दुसरे ट्विट रिचा चढ्ढा हिने केले आहे. परंतु तिच्यावरची टीकेची झोड मात्र कमी झालेली नाही. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी तिच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हीच ती रिचा चढ्ढा आहे, जिने गँग्स ऑफ वासेपुर मध्ये फजलच्या आईची भूमिका केली होती आणि आता ती लवकरच अली फजलशी विवाह करणार आहे. लोकांनी याच मुद्द्याची मीम्स बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करून रिचा चढ्ढा हिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Police case against Richa Chadha for insulting martyrs in Galwan
महत्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये पंपूर मधल्या शिव मंदिराचा होणार जीर्णोद्धार; अतिक्रमण हटवण्याचे महापौर याकूब मलिकांचे निर्देश
- ठाकरे – आंबेडकर – पवार एकत्र येण्याच्या नुसत्याच चर्चा, पण दलित पॅंथरचा एकनाथ शिंदेंना खुला पाठिंबा
- ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून बिस्मिल्ला ए रहमान ए रहीम म्हणत सुषमा अंधारेंनी समजावले इस्लामचे 5 फर्ज!