• Download App
    संदेशखालीत अत्याचार पीडित महिलांच्या मॅजिस्ट्रेट समोर जबाबानंतर पोलीस कारवाई सुरू; पण मास्टरमाईंड शहाजहान शेख फरार!!|Police action initiated after statement before Magistrate of rape victims under Sandesh; But the mastermind Shahjahan Sheikh absconded!!

    संदेशखालीत अत्याचार पीडित महिलांच्या मॅजिस्ट्रेट समोर जबाबानंतर पोलीस कारवाई सुरू; पण मास्टरमाईंड शहाजहान शेख फरार!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूळ काँग्रेसचा म्होरक्या शहाजहान शेख याने आणि त्याच्या अन्यसाथीदारांनी अत्याचार केलेल्या महिलांनी पुढे येऊन जेव्हा थेट मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदणी केली, तेव्हा नाईलाजाने ममता बॅनर्जी सरकारला जाग येऊन प्रत्यक्षात तिथे पोलीस कारवाई सुरू झाली. राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. महिला अत्याचार प्रकरणात गॅंग रेपचे लावण्यात आले असून तृणमूळ काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तम सरकार आणि शिवूप्रसाद यांना पोलिसांनी अटक केली, पण या अत्याचार प्रकरणाचा मास्टरमाइंड शहाजहान शेख मात्र अजूनही फरार आहे.Police action initiated after statement before Magistrate of rape victims under Sandesh; But the mastermind Shahjahan Sheikh absconded!!



    संदेशखाली गावात तृणमूळ काँग्रेसचा म्होरक्या शहाजहान शेख आपल्याला हव्या त्या घरात घुसून हिंदू महिलेला उचलून पक्ष कार्यालयात आणून तिच्यावर अत्याचार करायचा. तृणमूळ काँग्रेसचे बाकीचे म्होरके देखील या अत्याचारांमध्ये सामील करून घ्यायचा. याविषयी तिथल्या महिलांनी मोर्चा काढल्यानंतर या अत्याचाराच्या अत्यंत गंभीर विषयाला तोंड फुटले. केंद्रीय महिला आयोगाने दखल घेऊन तिथे शिष्टमंडळ पाठविले आणि महिलांचे जबाब नोंदवले पण तरी देखील ममता बॅनर्जी सरकारने या महिला अत्याचाराच्या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर खासदारांच्या शिष्टमंडळाने संदेश खालील जाऊन महिलांच्या भेटी गाठी घेतल्या. त्यांच्या भयावह कहाण्या ऐकून घेतल्या.

    त्यानंतर महिला अत्याचारा विरोधात पश्चिम बंगाल मधले वातावरण तापले संपूर्ण देशभर शहाजहान शेख विरुद्ध संतापाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे ममता बॅनर्जींनी या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन विधानसभेत कालच निवेदन केले. परंतु प्रत्यक्षात कारवाई काल सुरू केले नव्हती अत्याचार झालेल्या महिलांनी मॅजिस्ट्रेट्स समोर जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांना प्रत्यक्ष कारवाई करण्याला पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे संदेशखालीत गुंड मवाल्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली. हे गुंड मवाली कोणीही असतील तरी त्यांना सोडणार नाही असे वक्तव्य राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना करावे लागले.

    परंतु अद्याप शहाजहान शेख याला अटक झालेली नाही. तो आजही “सुरक्षित” असल्याचेच बोलले जाते. कदाचित त्याला काही दिवस पश्चिम बंगाल मध्येच “सुरक्षित” ठेवून नंतर बांगलादेशमध्ये रवानगी करण्यात येण्याची शक्यता गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.

    Police action initiated after statement before Magistrate of rape victims under Sandesh; But the mastermind Shahjahan Sheikh absconded!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू