PNB Scam : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये मोठा धक्का बसला आहे. डोमिनिका सरकारने मेहुल चोकसीला अवैध प्रवासी घोषित केले आहे. या संदर्भातील एक आदेश डोमिनिका सरकारने 25 मे रोजी जारी केला होता. PNB Scam accused fugitive Mehul Choksi declaired illegal immigrant by Dominica Government
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये मोठा धक्का बसला आहे. डोमिनिका सरकारने मेहुल चोकसीला अवैध प्रवासी घोषित केले आहे. या संदर्भातील एक आदेश डोमिनिका सरकारने 25 मे रोजी जारी केला होता.
अँटिगामध्ये राहणाऱ्या मेहुल चोकसीने 23 मे रोजी डोमिनिका गाठले, तेव्हापासून त्याला डोमिनिका पोलिसांनी पकडले आणि आतापर्यंत तो पोलीस कोठडीत आहे. मेहुल चोकसीने जामीन याचिका दाखल केली आहे, परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डोमिनिका प्रशासनाने ही कागदपत्रे कोर्टासमोर ठेवले आणि मेहुल चोकसीच्या याचिका फेटाळून लावल्या पाहिजेत आणि त्याला भारतात पाठवावे, असे आवाहन केले. सरकारच्या या आदेशामुळे मेहुल चोकसीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे त्याचा अपहरणाचा बनावही उघडा पडला आहे.
मेहुल चोकसीवर पंजाब नॅशनल बँकेची 13,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मेहुल चोकसी बराच काळ अँटिग्वामध्ये राहत होता. तथापि, 23 मे रोजी त्याने डोमिनिका गाठले. मेहुल चोकसीच्या वकिलाने असा दावा केला की, मेहुल चोकसीचे अपहरण करण्यात आले आणि जबरदस्तीने त्याला डोमिनिका येथे आणण्यात आले होते.
मेहुल चोकसीच्या वतीने, बार्बरा नावाच्या मुलीने त्याची दिशाभूल केल्याचा आरोप करून नंतर त्याचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. बार्बराने हे स्पष्ट केले होते की, ती मेहुल चोकसीची प्रेयसी नाही. मेहुल चोकसीने तिला एका वेगळ्या नावाने भेटला होता आणि एक फेक गिफ्ट दिले होते.
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात मेहुल चोकसी डोमिनिकामध्ये पकडला गेला, तेव्हा त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अधिकाऱ्यांची टीमही तिथे पोहोचली. तथापि, या दिशेने कोणतेही यश मिळाले नाही. आता मेहुल चोकसीला डोमिनिकाचे कोर्ट जामीन मंजूर करते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
PNB Scam accused fugitive Mehul Choksi declaired illegal immigrant by Dominica Government
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुलींना मोबाइल देऊ नका, गुन्हेगारी वाढण्याचे हेच प्रमुख कारण’, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्यांचे विधान
- राष्ट्रवादी वर्धापनदिनी शरद पवार म्हणाले, शिवसेना हा सर्वात विश्वासार्ह पक्ष, सरकार पाच वर्षे टिकेल!
- रामदेव बाबाही घेणार कोरोनाची लस, म्हणाले- माझा लढा डॉक्टरांशी नव्हे, ड्रग माफियांशी, आणीबाणीत अॅलोपॅथी उत्तम
- ठाकरे सरकारचा ‘पारदर्शी’ कारभार!, कोविड पोर्टलवर साडेअकरा हजार मृत्यूंची नोंदच नाही
- मुंबईत पावसाचा कहर : मालवणी भागात 4 मजली इमारत कोसळून 11 ठार, 7 जखमी; 15 जणांना वाचविण्यात यश