वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये उंच उडी भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या निषाद कुमार याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कॉल करून त्याचे अभिनंदन केले. निशाद कुमार याने पंतप्रधानांचे आभार मानले.PM’s call to Para Olympian silver medalist Nishad Kumar; Strong celebration at the house of Nishad Kumar, Vinod Kumar He has been asked to appear before the agency on Tuesday: ED
निशाद कुमार हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील बदाँऊ गावाचा रहिवासी आहे. निशाद कुमारने रौप्य पदक जिंकल्याची बातमी येताच संपूर्ण गावात जोरदार सेलिब्रेशन झाले. त्याच्या घरी ग्रामस्थांनी गर्दी करून त्याच्या आईचे मिठाई भरवून अभिनंदन केले. केंद्र सरकारने पॅराऑलिम्पिक खेळाडूंना खूप प्रोत्साहन दिल्याने खेळाडूंची कामगिरी चमकदार होत आहे, अशी प्रतिक्रिया निशाद कुमार याच्या आईने व्यक्त केली.
थाळी फेकीत ब्राँझ पदक मिळवणारा विनोद कुमार हरियाणातील रोहटकचा रहिवासी आहे. त्याच्या घरीही जोरदार सेलिब्रेशन झाले. रोहटक मधील अनेक नागरिकांनी त्याच्या घरी जाऊन त्याची पत्नी अनिता हिला मिठाई भरून आनंद व्यक्त केला. यावेळी अनिता यांना आनंदअश्रू आवरले नाहीत.