• Download App
    रामानुजाचार्य यांनी समतेचा संदेश सर्व देशभर पोहोचविला; पंतप्रधानांच्या हस्ते अतिभव्य मूर्तीचे तेलंगणात अनावरण!! PM Shri narendramodiinaugurates 'Statue of Equality' commemorating Bhakti Saint Sri Ramanujacharya in Hyderabad

    रामानुजाचार्य यांनी समतेचा संदेश सर्व देशभर पोहोचविला; पंतप्रधानांच्या हस्ते अतिभव्य मूर्तीचे तेलंगणात अनावरण!!

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : थोर संत समाजसुधारक भगवान रामानुजाचार्य यांनी समतेचा संदेश संपूर्ण देशभर पोहोचविला. त्यांचा जन्म दक्षिणेतला असला तरी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सर्व भारतावर त्यांचा प्रभाव होता, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामानुजाचार्य यांना वंदन केले.PM Shri narendra modi inaugurates ‘Statue of Equality’ commemorating Bhakti Saint Sri Ramanujacharya in Hyderabad

    हैदराबाद पासून 40 किलोमीटर अंतरावरील रामनगर येथे रामानुजाचार्य यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी रामानुजाचार्य यांच्या जीवनाचा आढावा घेतला. रामानुजाचार्य यांनी समतेचा संदेश मानवतेला देताना संस्कृत आणि तमिळ भाषांचा समन्वय साधला. दोन्ही भाषांना सारखेच महत्त्व देत भाषांचे उन्नयन केले. त्याच वेळी समाजातील भेदाभेद दूर सारून सर्व समाजघटकांना अध्यात्माचा मौलिक अधिकार प्रदान केला, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक प्रेरणास्त्रोतांपैकी रामानुजाचार्य हे एक संत होते, याचा उल्लेख देखील पंतप्रधानांनी आवर्जून केला.



    रामानुजाचार्य यांच्या समतेच्या संदेशातून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला देखील प्रेरणा मिळाल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले, की भारताचा स्वातंत्र्य संग्राम ही केवळ अधिकारांची लढाई नव्हती तर वांशिक वसाहतवाद आणि वांशिक वर्चस्ववाद यांना झुगारण्याची ही लढाई होती. भारताने रामानुजाचार्य यांच्यासारख्या संतांचा आदर्श पुढे ठेवत ही लढाई जिंकली आहे. गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला एकतेचा संदेश देते, तर स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी आपल्याला समतेचा संदेश देते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

    यानंतर रामानुजाचार्य यांच्या जीवनावर आधारित भव्य लेसर शो चे उद्घाटन देखील पंतप्रधानांनी केले. सुमारे 15 मिनिटांच्या या शोमधून रामानुजाचार्य यांच्या जीवन पटाचे आणि महान कार्याचे दर्शन घडते. स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी हा संपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल जगभरातील लोक ते पाहण्यासाठी रामनगर ला येतील, असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

    PM Shri narendramodiinaugurates ‘Statue of Equality’ commemorating Bhakti Saint Sri Ramanujacharya in Hyderabad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त