मागील काही वर्षांत अतिशय कठीण जागतिक परिस्थितीतही भारताने विकासाचा वेग कायम ठेवला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ओडिशाला 8000 कोटी रुपयांचा प्रकल्प भेट दिला. यासोबतच पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोदी म्हणाले की, ‘’आज ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना वंदे भारत ट्रेनची भेट मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारत आणि महत्वाकांक्षी भारतीय या दोहोंचे प्रतीक बनत आहे.’’ PM Shri Narendra Modi launches railway projects in Odisha flags off Vande Bharat Express between Puri and Howrah
पंतप्रधान म्हणाले की, आज जेव्हा वंदे भारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा भारताचा वेग आणि भारताची प्रगती त्यात दिसून येते. आता कोलकाता ते पुरी जायचे असो किंवा पुरी ते कोलकाता हा प्रवास फक्त साडेसहा तासांचा झाला आहे. याचबरोबर ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारताने अत्यंत कठीण जागतिक परिस्थितीतही विकासाचा वेग कायम ठेवला आहे. या विकासात प्रत्येक राज्याचा सहभाग आहे, प्रत्येक राज्याला बरोबर घेऊन देश पुढे जात आहे, हे त्यामागे एक मोठे कारण आहे.
याचबरोबर ते म्हणाले की, गेल्या पंतप्रधान म्हणाले की, आजचा नवा भारत देखील तंत्रज्ञान स्वतः बनवत आहे आणि वेगाने नवीन सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात नेत आहे. भारताने ही वंदे भारत ट्रेन स्वतः बनवली आहे. आज भारत 5G तंत्रज्ञान स्वतः विकसित करत आहे आणि ते देशाच्या दूरवरच्या भागात घेऊन जात आहे.या विकासात प्रत्येक राज्याचा सहभाग आहे, प्रत्येक राज्याला बरोबर घेऊन देश पुढे जात आहे, हे त्यामागे एक मोठे कारण आहे.
पंतप्रधान म्हणाले की, आजचा नवा भारत देखील तंत्रज्ञान स्वतः बनवत आहे आणि वेगाने नवीन सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात नेत आहे. भारताने ही वंदे भारत ट्रेन स्वतः बनवली आहे. आज भारत 5G तंत्रज्ञान स्वतः विकसित करत आहे आणि ते देशाच्या दूरवरच्या भागात घेऊन जात आहे.
PM Narendra Modi launches railway projects in Odisha flags off Vande Bharat Express between Puri and Howrah
महत्वाच्या बातम्या
- अखेर कर्नाटकचं नाटक संपलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार यांची ‘या’ पदावर बोळवण
- द फोकस एक्सप्लेनर : कसा होतो हिंडेनबर्गचा रिपोर्ट, अमाप कमाई करणारे कोण आहेत नॅथन अँडरसन? वाचा सविस्तर
- राज्यात 15 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, पैकी दहा जिल्हे एकट्या विदर्भातील
- CBI Summons : समीर वानखेडेला CBI कडून चौकशीसाठी समन्स, आर्यन खानशी संबंधित प्रकरण