- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली.
- त्यामुळे मोदींना हा दौरा अर्ध्यावरच टाकून परतावे लागले आहे. आता या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमधील रॅलीला जात असताना पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. ते 20 मिनिटे एका पुलावर अडकले होते ही बाब अतिशय गंभीर होती आणि त्यांना परतावे लागले. PM SECURITY-BLUE BOOK: Mistake or conspiracy in PM Modi’s security? The jammers already knew the route – Punjab Police did not follow the ‘Blue Book’
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती, त्या पंजाब पोलिसांनीच त्यांच्या प्रवास मार्गाची माहिती लीक केल्याचे आता सांगण्यात येत आहे. शिवाय, पंजाब पोलिसांनी “ब्लू बुक” चे देखील पालन केले नाही आणि पंतप्रधानांसाठी “आकस्मिक मार्ग” तयार केला नाही.
पंजाबमध्ये काही ठिकाणी निदर्शने होणार असल्याचे इनपुट गुप्तचर विभागाने दिले होते. पण पंजाब पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. तसेच ब्ल्यू बुक नियमांकडेही कानाडोळा केला असल्याचं गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्ल्यू बुकनुसार, राज्य पोलिसांना कोणतीही प्रतिकूल परिस्थिती दिसून आल्यास, त्यावेळी एक पर्यायी आकस्मिक मार्ग तयार ठेवायचा असतो.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी सातत्याने पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते. तसेच पंजाब पोलिसांना आंदोलकांबाबत माहिती देण्यात आली होती. पंजाब पोलिसांनीही सुरक्षेची संपूर्ण हमी दिली होती.
आंदोलनकार्यांसह पोलीस घेत होते चहा –
पोलिसांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक हालचालीची त्यांना माहिती होती, असे आंदोलक स्वत: सांगत आहेत, तर आंदोलकांनी उड्डाणपूल अडवल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले नाही, असे म्हणणे उपरोधिक ठरेल. असे काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये पंजाब पोलीस आंदोलकांसोबत चहा घेत होते, ज्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याला 20 मिनिटे रोखून ठेवले होते.
इतर सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारचीच
एसपीजीचे जवान पंतप्रधानांच्या सुरक्षेत असतात. मात्र, तरीही इतर सुरक्षेच्या उपायांची जबाबदारी राज्य सरकारच्या हातात असते. तसेच वारंवार होणाऱ्या बदलांची माहिती राज्य पोलिसांकडून एसपीजीला दिली जाते. त्यानुसार व्हीव्हीआयपी सुरक्षेचा निर्णय घेतला जातो. त्यात बदल केला जातो.
काल काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.
PM SECURITY-BLUE BOOK : Mistake or conspiracy in PM Modi’s security? The jammers already knew the route – Punjab Police did not follow the ‘Blue Book’
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस यांचा रश्मी ठाकरेंना फोन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची केली चौकशी
- Breaking News : MHADA Exam-म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या कधी होणार परीक्षा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : पंजाब सरकारच्या बचावात शेतकरी नेते टिकैत, फुल आखाड्यात!!
- BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय
- PM SECURITY : पंजाब-मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात; सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल; उद्या सुनावणी