विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका फार दूर नाहीत, त्यामुळे काही लोक घाबरणे स्वाभाविक आहेत. पण शेवटी लोकशाही मधली ती अनिवार्य परीक्षा आहे, ती तर द्यावीच लागेल, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सतराव्या लोकसभेतल्या आपल्या अखेरच्या भाषणात लगावला.PM says, “Elections are not very far, a few might be nervous. But this is an essential aspect of democracy.
सतराव्या लोकसभेचे अधिवेशन आज संपले. त्यापैकी अखेरचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. या भाषणात मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. लोकसभेने वेगवेगळे कायदे करण्यात आले काही कायदे बदलण्यात सर्वोत्तम कामगिरी केली. याविषयी गौरव उद्गार काढले.
नारी शक्ती विधेयक, तीन तलाक विरोधी विधेयक, भारतीय न्याय दंड संहिता यांच्यासारखी देशाचा चेहरा मोहरा बदलणारी विधेयके याच सतराव्या लोकसभेने मंजूर केली आणि देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले हा मुद्दा पंतप्रधान मोदींनी आवर्जून नोंदविला.
देशात एक निशान एक संविधान हे स्वप्न विधानपिढ्यांनी बघितले होते. ते स्वप्न या सतराव्या लोकसभेने साकार केले. जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटविले. त्यामुळे जम्मू काश्मीर भारताचा खऱ्या अर्थाने अभिन्न भाग झाला.
22 जानेवारी हा देश दिवस तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. जगातल्या कोट्यावधी रामभक्तांचे स्वप्न साकार झाले. हे स्वप्न साकारण्याची सतरावी लोकसभा साक्षीदार बनली याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
मात्र त्याच वेळी त्यांनी काँग्रेस सह बाकी सगळ्या विरोधकांना जबरदस्त टोला हाणला. लोकसभेच्या निवडणुका आता फार दूर नाहीत. त्यामुळे काही लोक घाबरले आहेत. पण जनतेसमोर जाणे ही लोकशाहीची अनिवार्य घटना आहे, ती आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे. लोकसभेची निवडणूक शांतता आणि सौहार्दात पार पडणे हा देशासाठी गौरवाचा दिवस असेल. संपूर्ण जग भारतीय लोकशाहीकडे आशेने बघत आहे. निवडणुकांमधून यशस्वी निवडणुकांमधून याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून लक्ष वेधले.
PM says, “Elections are not very far, a few might be nervous. But this is an essential aspect of democracy.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
- भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत – मोदी
- PSU शेअर्सवर मोदींची हमी! पंतप्रधानांच्या भाषणानंतर 22 मल्टीबॅगर्स अन् 24 लाख कोटींचा नफा
- सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईदला मोठा धक्का बसला, मुलाचा दारुण पराभव